Arjun Kapoor challenges Uchi Bhambri's challenge | अर्जुन कढेसमोर सलामीला यूकी भांब्रीचे आव्हान  

पुणे - पुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे. मरिन सिलीच, रॉबर्टो बोटिस्टा आॅगट, बेनॉय पायरे आणि केविन अँड्रीसन या अव्वल मानांकित खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला. शनिवारी मुख्य फेरीचे ड्रॉ एका शानदार समारंभात जाहीर करण्यात आले.
महाराष्टÑ टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटी) होणाºया मुख्य स्पर्धेत अग्रमानांकित मरिन सिलीच व गतविजेता रॉबर्टो बोटिस्टा यांना थेट दुसºया फेरीत प्रवेश मिळाला आहे. यूकी विरुद्ध अर्जुन ही सलामी लढत प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरेल.
भारताच्या आशा २३ वर्षीय रामकुमार रामनाथनवर आहेत. त्याच्यासमोर पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत १६६ व्या क्रमांकाच्या रॉबर्टो बायेणाचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत ४२ व्या रॉबिन ह्यासे, स्लोव्हेनियाच्या ब्लेज कावकीकशी झुंजेल. फ्रान्सच्या किमॉन जाईल अमेरिकेच्या स्टेनिस सँडग्रेन्स विरुद्ध लढेल.
या समारंभाला भारताचे महान टेनिसपटू विजय अमृतराज, एटीपीचे स्पर्धा संचालक टॉम एनियर, एटीपी टूर मॅनेजर अर्नो बृजेस, एटीपी निरीक्षक मायरो ब्रटोएव्ह, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, फ्रान्सचा टेनिसपटू बेनॉय पेर, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस व यूकी भांब्री उपस्थित होते.

मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा सर्व्ह आणि व्हॉली शैलीचा खेळ होता. त्यानंतर सर्व्ह आणि रिटर्न पद्धतीचा खेळ सुरू झाला. पण आता त्यात अजून बदल झाला. दुहेरीत खेळाडू दीर्घ काळ एका साथीदारासोबत खेळत असे, पण आता ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतरही साथीदार बदलताना दिसतात. याचे कारण त्यांना एकेरीतील यश अधिक महत्त्व वाटते. - लिएंडर पेस, स्टार टेनिसपटू