Zee Youth is taking part in Dance Dance Dance | ​झी युवा घेऊन येतोय डान्स महाराष्ट्र डान्स

महाराष्ट्रातील अनेक कलाकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी त्यांना फार कमी उपलब्ध होतात. महाराष्टातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाला अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. झी युवावरील हा सिंगिंग रिअॅलिटी शो चांगलाच हिट झाला होता. यानंतर आता नृत्यावर आधारित एक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सध्या हिंदी, मराठी वाहिन्यांवर अनेक डान्सिंग रिअॅलिटी शो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात आता आणखी एका कार्यक्रमाची भर पडणार आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने नेहमीच स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. डान्स म्हणजे स्वातंत्र्य, डान्स म्हणजे नजाकत, डान्स म्हणजे भावना आणि डान्स म्हणजे एन्जॉयमेंट. बेभान होऊन नाचताना त्या नृत्याला जेव्हा मराठमोळा टच असेल तेव्हा त्याची मजा काही निराळीच असेल. हीच खासियत असणार आहे झी युवावर सुरू होणाऱ्या डान्स महाराष्ट्र डान्स या रिअॅलिटी शोची. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले नृत्यगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. 
डान्स महाराष्ट्र डान्समध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑडिशन्स घेतली जाणार आहेत. या ऑडिशन्सला लवकरच सुरुवात होणार असून कोणत्याही वयोगटातले स्पर्धक यात सहभागी होऊ शकणार आहेत. ही ऑडिशन्स नागपूरला १७ डिसेंबरला, औरंगाबादला २० डिसेंबरला, नाशिक येथे २२ डिसेंबरला, पुणे येथे २४ डिसेंबरला, कोल्हापूर य़ेथे २६ डिसेंबरला आणि मुंबईमध्ये २८ डिसेंबरला होणार आहेत. स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट नृत्यप्रकारचेही बंधन नसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. वेगवेगळ्या पाश्चिमात्य डान्स स्टाइल्सला मराठमोळा तडका देऊन नृत्याविष्कार सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. यात स्पर्धकाने सहभागी होण्यासाठी त्याच्यावर कोणतेही बंधन नसल्याने या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 
Web Title: Zee Youth is taking part in Dance Dance Dance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.