Zee Youth Series Love Lloyd's Meet In New Time From Monday | ​झी युवाची मालिका लव्ह लग्न लोचा सोमवारपासून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला!!

झी युवावरील लव्ह लग्न लोचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील राघव, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांशा, श्रीकांत आणि आता नवीन आलेले पण या लव्ह लग्न लोचाच्या कुटुंबात पूर्णपणे मुरलेले ऋता आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देत आहेत. प्रेक्षकांची आवडती मालिका लव्ह लग्न लोचा आता एका नवीन वेळेवर दिसणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. यापुढे आता १८ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवा वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते जोडपे म्हणजेच विनय आणि आकांक्षाचे फायनली लग्न होणार आहे, विनय आकांक्षाचे लग्न, त्यानिमित्ताने त्याची आगळी वेगळी बॅचलर पार्टी, कोर्ट मॅरेज करताना येणारी धमाल, उडणारा गोंधळ, विनय आकांक्षाचा गृहप्रवेश आणि लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची तयारी अशा अनेक प्रसंगातून नवनवे लोचे या मालिकेत घडणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना राघवाच्या माँ साहेबांना पाहाण्याची इच्छा होती, त्या माँ साहेब म्हणजेच अभिनेत्री शुभांगी लाटकर यांची मालिकेत एंट्री होणार आहे. या मालिकेला वर्षं होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा काही संपत नाहीये. प्रेक्षकांच्या दृष्टीने लव्ह लग्न लोचा ही एक मस्त जमून आलेली मालिका आहे. प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा, प्रत्येक कलाकाराचा अवाका अोळखून रचलेले प्रसंग आणि कलाकारांनी त्यावर केलेली मेहनत पाहून लेखक, दिग्दर्शक एक वेगळीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला, भरभरून कौतुक केले असाच प्रतिसाद कायम राहील आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये मालिकेची सर्व टीम आणि झी युवा वाहिनी तत्परतेने पुढे राहील असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. 
 
Also Read : लव्ह लग्न लोचा फेम सिद्धी कारखानीसचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?
Web Title: Zee Youth Series Love Lloyd's Meet In New Time From Monday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.