‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेत झेन इमाम साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 07:15 AM2019-03-21T07:15:00+5:302019-03-21T07:15:02+5:30

झेन इमामने याआधी ‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या मालिकेत नीलची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली होती. अभिनेता झेन इमाम हा आता ‘स्टार प्लस’वरीलच मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ZAIN IMAM TO BE SEEN AS A RETIRED ARMY OFFICER IN STARPLUS’ UPCOMING SHOW EK BHRAM SARVAGUN SAMPANNA | ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेत झेन इमाम साकारणार ही भूमिका

‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेत झेन इमाम साकारणार ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या नव्या मालिकेत त्याने एक गंभीर व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यात तो एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘स्टार प्लस’वर ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ ही मालिका लोकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. ही मालिका एका वेगळ्या विषयावर असून या आगामी मालिकेत अभिनेता झेन इमाम निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

झेन इमामने याआधी ‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या मालिकेत नीलची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली होती. अभिनेता झेन इमाम हा आता ‘स्टार प्लस’वरीलच मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच वाहिनीसोबत पुन्हा काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. 

झेनने एक आकर्षक आणि देखणा नायक अशी आपली प्रतिमा छोट्या पडद्यावर उभी केली असून ती कैसी ये यारीयाँ, नामकरण  आणि इश्कबाझ  या मालिकांमधून कायम राखली होती. पण आता ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या नव्या मालिकेत त्याने एक गंभीर व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यात तो एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 

आपल्या ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या नव्या मालिकेतील भूमिकेबद्दल झेन सांगतो, “या मालिकेच्या निर्मात्या दीप्ती कलवाणी यांच्याबरोबर मी यापूर्वीही काम केलं असल्यानेच मी या नव्या मालिकेतील भूमिका स्वीकारली. त्यांच्या मालिकांच्या सेटवर नेहमी एक आनंदी आणि खूपच छान वातावरण असतं. कोणतंही काम स्वीकारताना या गोष्टीला मी प्राधान्य देतो. तसंच स्टार प्लस वाहिनीवर काम करणं म्हणजे मला स्वगृहीच काम करत असल्यासारखं वाटत आहे. नवी भूमिका साकारण्यास मी अधीर झालो आहे.”

या भूमिकेची तयारी कशाप्रकारे केली असे विचारले असता झेन सांगतो, “लष्करी अधिकाऱ्याची भूमिका ही एका आदरणीय व्यक्तीची असते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी इतकी मान्यवर भूमिका स्वीकारलेली नाही. मी कॉलेजमध्ये असताना एक आठवडाभर लष्करी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम केला होता; त्यामुळे मला लष्करामधील व्यक्तीच्या मानसिकतेची कल्पना आहे.”

झेन इमामची ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ मधील भूमिका त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल अशी त्याला खात्री आहे. 

Web Title: ZAIN IMAM TO BE SEEN AS A RETIRED ARMY OFFICER IN STARPLUS’ UPCOMING SHOW EK BHRAM SARVAGUN SAMPANNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.