Your beloved Rituja Bagwai has done this Diwali shopping festival! | तुमच्या लाडक्या ऋतुजा बागवेने अशी केली दिवाळीची शॉपिंग धम्माल!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'नांदा सौख्य भरे' या मालिकेचंही नाव घ्यावं लागेल. मालिकेच्या कथानकासह या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली. या व्यक्तीरेखांपैकी घराघरात लाडकी बनलेली व्यक्तीरेखा म्हणजे स्वानंदी.कितीही अडथळे आले तरी सत्याच्या मार्गावर चालणारी स्वानंदी रसिकांना भावली होती. इंद्रनीलशी लग्न झाल्यानंतरही स्वानंदी सत्याची कास सोडत नाही.त्यामुळे स्वानंदी ही भूमिका आणि ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा 
बागवे रसिकांची फेव्हरेट बनली होती.या मालिकेत स्वानंदीचा सरळ स्वाभावाची असणा-या स्वानंदी म्हणजेच ऋतुजा बागवे हिचा सिंपल लूक पाहायला मिळाला. मालिकेत सिंपल लूक असला तरी रिअल लाइफमध्ये फॅशनच्या विविध प्रकारच्या नवनवीन स्टाईल ऋतुजाताला ट्राय करायला आवडतात.
त्यामुळेच तिने नुकतेच काही तरी हटके स्टाईलच्या कपड्यांची शॉपिंग करायचं ठरवलं.त्यासाठी तिने मेलाकी बुटिकची निवड केली.या बुटिकचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुंबईतल्या दमट वातावरणाचा विचार करुन खास स्टाईलने डिझाईन केलेले कपडे पाहायला मिळतात. मुंबईतल्या वातावरणात घामामुळे अंगाला चिकटून राहणारे कपडे नकोसे वाटतात.हाच विचार करुन खास पॉलिस्टर कॉटन प्रकारातले कपडे या बुटिकमध्ये पाहायला मिळाले. हीच खासियत ऋतुजालाही भावली. बाहेर फिरण्यासाठी असो किंवा मग दररोज वापरण्यासाठी अशा दोन्हीचा विचार करुन ऋजुताने या स्टाईलचे कुर्ता आणि ड्रेस याची शॉपिंग केली.याशिवाय प्रत्येक स्त्रीला साडी ही हवीहवीशी वाटते. या बुटिकमध्ये विविध राज्याची खासियत असणा-या साड्या पाहायला मिळाल्या.कोलकाता साडी असो किंवा दाक्षिणात्य प्रकारच्या साड्या इथं पाहायला मिळाल्या.या साड्यांची शॉपिंग करण्याचा मोहसुद्धा ऋजुताला काही आवरला नाही.अशाप्रकारे ऋतुजाने सीएनएक्स लोकमतसाठी टॅगर्सच्या मदतीने ही फुल ऑन शॉपिंग केली. ऋतुजा लवकरच एका नव्या नाटकातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Your beloved Rituja Bagwai has done this Diwali shopping festival!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.