'You Suraj Me Sahej Piyaji' will be released in the new look of Sharma! | ‘तू सूरज मैं साँझ पियाजी’मध्ये रिहा शर्मा दिसणार नव्या लूकमध्ये!

‘दिया और बाती हम’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेचा पुढील भाग असलेल्या ‘तू सूरज मैं साँझ पियाजी’ मालिकेच्या रंजक कथानकामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.या मालिकेत पूर्वीच्या मालिकेतील काही नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत तर आहेतच, पण रिहा शर्मा आणि अविनाश रेखी यांच्यातील नाजूक नात्यांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.कनक (अविनाश रेखी) आणि उमा (रिहा शर्मा) यांच्या तील घटस्फोटामुळे मालिकेच्या कथानकाला नवीन वळण मिळाले आहे.या घटस्फोटाचा सखोल परिणाम या दोघांच्या नात्यावर होत असला,तरी या घटनेला निर्मात्यांनी ‘तनू वेडस मनू’ या चित्रपटातील कथेप्रमाणे वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.आता कनकच्या व्यक्तिरेखेला शोभून दिसेल यासाठी त्यातील ‘घन बावरी’ हे गाणेही निर्मात्यांनी त्यात समाविष्ट केले आहे. आपल्या रिल लाईफ भावाच्या लग्नात या गाण्यावर डान्स करण्यासाठी रिहा शर्माने चार-पाच दिवस विशेष सराव केल्याचे सांगितले जात आहे.या गाण्यातील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रियाने त्यात पोशाखही कंगना राणौतसारखाच केला आहे.निर्मात्यांनी तिच्या लूकवर अनेक प्रयोगही केले आहेत.पण त्या गाण्यातील अस्सलपणा कायम ठेवण्याबद्दल रिहा विशेष आग्रही होती आणि म्हणून तिने कंगनासारखाच पोशाखही परिधान केला होता.

काही दिवसांपूर्वीच रिहा तिच्या ऑनस्क्रीन भावाची वेद राठीची भूमिका करणाऱ्या मयांक अरोरासोबत  डेटिंग करत असल्याच्या अफवा होत्या.पण रिहाला त्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मयांक माझ्यासाठी मेंटॉर आहे.माझ्या करिअरच्या या टप्प्यावर मला रिलेशनशिपमध्ये अडकायचे नाहीय.सध्या माझे लक्ष माझ्या कामावर आणि 'तू सूरज मैं सांझ पियाजी' मधील माझी व्यक्तिरेखा कनकवर केंद्रित आहे.”रिहाने यापूर्वी 'इतना करो ना मुझसे प्यार','ये है आशिकी','कहानी हमारी दिल दोस्ती दिवानेपन की',या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकली होती.मात्र रिहाला 'इतना करो ना मुझे प्यार' या मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली.तसेच रिहा 'एमएस धोनी: दि अनटोल्ड' स्टोरी सिनेमात झळकली होती. 
Web Title: 'You Suraj Me Sahej Piyaji' will be released in the new look of Sharma!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.