You have never seen this payment of Baba Ramdev, Yogguru should say that Tarjan? | बाबा रामदेव यांची ही अदा तुम्ही कधी पाहिलीच नसेल,योगगुरु म्हणावे की टारजन?

योगगुरु बाबा रामदेव आणि हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे योग आणि योगाभ्यास. शिल्पा शेट्टी आणि बाबा रामदेव यांची कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात जुगलबंदी पाहायला मिळते. बाबा रामदेव यांनी गेल्या काही वर्षात योगगुरु म्हणून देशातच नाही तर परदेशात लौकिक मिळवला आहे.दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपला अभिनय, सौंदर्य, अदा याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केले आहे. लग्नानंतर शिल्पाने योग, योगाभ्यास, योग प्रसार यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. योगाभ्यास संदर्भात तिच्या विविध सीडीसुद्धा आहेत.सध्या शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावर विविध डान्स रिअॅलिटी शोची जज म्हणून पाहायला मिळते. नुकतंच 'सुपर डान्सर चॅप्टर 2' डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर योगगुरु बाबा रामदेव यांनी हजेरी लावली. शोसाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरु यावेळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाने योगगुरु बाबा रामदेव यांच्यासह सेल्फी काढला. तर बाबा रामदेव यांनी छोट्या डान्सर्सना जज करता करता योगाचं महत्त्व तर पटवून दिलंच. शिवाय यावेळी योगगुरुंची धमाकेदार अॅक्शनही पाहायला मिळाली. सेटवर ज्यावेळी आपल्या डान्सचे कौशल्य दाखवत होते त्यावेळी योगगुरुंनाही डान्स करण्याची विनंती करण्यात आली. मग काय योगगुरुंचा उत्साह फारच दांडगा. विशेष विनंती झाल्यानं योगगुरु बाबा रामदेव स्वतःला रोखू शकले नाहीत. आपल्या अनोख्या आणि हटक्या स्टाईलने सा-यांचं मनोरंजन करत योगगुरुंनी धम्माल मस्ती केली. एरिअल अॅक्ट सादर करत योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या फिटनेसचाही नमुना दाखवून दिला. जंगलात टारजन ज्या प्रमाणे दोरीला लटकून एका झाडावरुन दुस-या झाडावर उडी मारतो तशी पोझ असलेले योगगुरु बाबा रामदेव यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे शिल्पाच्या शोमध्ये बाबा रामदेव टारजन बनल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.केवळ योगाभ्यासच नाही तर रिअॅलिटी शोमध्येसुद्धा योगगुरु बाबा रामदेव आपल्या जलवा दाखवण्यात कमी नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.वर्षभरापूर्वी कॉमेडीअन कपिल शर्माच्या शोमध्येही बाबा रामदेव यांनी अशाच प्रकारे स्टंट करत रसिकांची मनं जिंकली होती. 

Also Read:सुपर डान्सर या कार्यक्रमातील ​शिल्पा शेट्टीचा मराठमोळा लूक पाहिला का?
Web Title: You have never seen this payment of Baba Ramdev, Yogguru should say that Tarjan?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.