You can do this by registering the tenth edition of the Kaun Banega Crorepati program ... | ​तुम्ही अशाप्रकारे करू शकता कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनचे रजिस्ट्रेशन...

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगणार आहे प्रश्न उत्तरांचा रंगमंच. रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे दहावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून अमिताभ बच्चन ६ जून ते २० जून दररोज रात्री साडे आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येऊन एक प्रश्न विचारणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणार्‍या लोकांसाठी हा नोंदणी करण्याचा पहिला टप्पा असेल. नोंदणीसाठी या प्रश्नांची अचूक उत्तरे SMS, IVRS आणि सोनी LIV मार्फत देता येतील.
‘कौन बनेगा करोडपती’ बद्दल बोलताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे EVP आणि व्यवसाय प्रमुख दानिश खान म्हणाले, “भारताचा आवडता कार्यक्रम त्यांच्या लाडक्या सूत्रसंचालकासह म्हणजे अमिताभ बच्चनसह घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या वर्षी नोंदणीची मुदत सात दिवसांची होती आणि एकूण नोंदणी १९.८ मिलियन झाली होती. आम्हाला खात्री आहे की १४ दिवसांचा अवधी दिल्यावर आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे घवघवीत यश पाहता नोंदणीची संख्या नक्कीच नवा उच्चांक गाठेल.”
अमिताभ बच्चन यांनी रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन गाजले आहेत. त्यामुळे दहावा सिझन देखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : ​बिग बींनी ट्विटरला मारला टोमणा!
Web Title: You can do this by registering the tenth edition of the Kaun Banega Crorepati program ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.