Wishful Performance to be Performed at the Music Festival of Wikis | 'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स
'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स

ठळक मुद्देईशाची आई अप्सरा आली या गाण्यावर ताल धरून सर्वांना अचंबित करणार आहे जयदीप आईसाहेबांसोबत थिरकणार आहे

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. मोठमोठ्या कलाकारांच्या दिमाखदार आणि भव्य लग्नसोहळ्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत विकिशा म्हणजेच झी मराठी वरीललोकप्रिय मालिका तुला पाहते रे मधील विक्रांत आणि ईशाच्या शाही लग्नसोहळ्याचे. विक्रांत आणि ईशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. नवीन वर्षातील हे पाहिलंच शाहीलग्न आहे ज्याची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणी देखील एका वेगळ्याच पद्धतीने घातली तसंच १.५ लाखांची त्यांची लग्नपत्रिका यासगळ्यामुळे त्यांचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडणार आहेत.

संगीत समारंभ म्हंटलं कि वधू आणि वारपक्षाचा एकच कल्ला असतो. एका पेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर करत कुठल्या पक्षाचं पारडं जाड आहे ही एक वेगळीच स्पर्धा असते. विकिशाचं लग्न हे अभूतपूर्व आहे त्यामुळे संगीत समारंभ देखील तितक्याच शाही अंदाजात पार पडणार आहे. या समारंभात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार सहभागी होणार आहे.  या समारंभात इशा आणि विक्रांत हे दोघे ही सैराट होणार असून मायरा 'ही पोळी साजूक तुपातली' या गाण्यावर परफॉर्म करून कार्यक्रमाला ४ चांद लावणार आहे.  जयदीप आईसाहेबांसोबत थिरकणार आहे. पण या सगळ्यांमध्ये भाव खाऊन जाते ती म्हणजे ईशाची आई. ईशाची आई अप्सरा आली या गाण्यावर ताल धरून सर्वांना अचंबित करणार आहे. ही सर्व धमाल प्रेक्षक येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या २ तासांच्या विशेष भागात पाहू शकतो.


Web Title: Wishful Performance to be Performed at the Music Festival of Wikis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.