Will the watchman take off the audience soon? | ​​पहरेदार पिया की घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप?

पहरेदार पिया की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका बंद करण्यात यावी यासाठी प्रेक्षक मागणी करत असून सोशल मीडियावर या मालिकेच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम देखील सुरू आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ब्रॉडकास्टिंग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिलकडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ही मालिका लवकरच बंद केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.  
'पहरेदार पिया की' या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी पाहायला मिळत आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या पचनी पडत नसल्याचे दिसतंय. एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी यांच्यात प्रेमकहानी कशी असू शकते? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. उगाच 'सब कुछ बिगता है'च्या नादात सुरू करण्यात आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांच्या रागाचा चांगलाच सामना करावा लागतोय. सोशल मीडियावर या मालिकेच्या विरोधात अनेक जण आपली मते नोंदवत आहेत. आता तर पहरेदार पिया की ही मालिका लवकरात लवकर बंद करण्यात यावी यासाठी प्रेक्षकांनी स्वाक्षरी मोहीमच सुरू केली आहे. ही मालिका बंद कऱण्यात यावी यासाठी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहे. ही मोहीम सोशल मीडियावर सुरू असून आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांनी यावर सह्या केल्या आहेत.

Also Read : ​पहेरदार पिया की या मालिकेवर बंदी आणण्याची प्रेक्षकांची मागणी

Web Title: Will the watchman take off the audience soon?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.