Will Taraka Mehta's reverse chashma series be bye-bye? Read the reason behind! | ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेला बाय-बाय करणार दयाबेन? वाचा त्यामागचे कारण!

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या अतिशय लोकप्रिय मालिकेशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. अर्थात ही बातमी या शोच्या चाहत्यांना निराश करणारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेची ‘जान’ असलेल्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानी ही मालिका सोडण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक याविषयी दिशा किंवा चॅनेलकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले गेले नाही. काही काळापूर्वीच दिशा वकानीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. असे म्हटले जात होते की, मार्चनंतर ती मालिकेत पुन्हा परतणार आहे. मात्र आता तसे घडताना दिसत नसल्याने, दयाबेन पुन्हा या शोमध्ये दिसणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दिशाची मुलगी खूपच लहान असून, तिच्या पालनपोषणासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. याच विषयाच्या अनुंषगाने मालिकेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, दिशा मार्चच्या अखेरपर्यंत सांगणार की ती मालिकेत परतणार की नाही? वास्तविक गेल्या काही काळापासून सातत्याने अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले जात नाही तोपर्यंत या नव्या अफवा तर पसरवल्या जात नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. जर दिशाने हा शो सोडला तर तिच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असेल. कारण तिच्या बोलण्याची तºहा आणि हसण्यांचा अंदाज प्रेक्षकांना आपलेसे करणारा आहे. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेत दयाबेनच्या मुलाची भूमिका साकारणाºया टप्पूने अर्थात भव्य गांधीने काही काळापूर्वीच मालिकेला बाय-बाय केला. त्याला गुजराथी चित्रपटात काम मिळाले होते. दरम्यान, दिशाने मालिका सोडल्यास त्याचा परिणाम टीआरपीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, दिशाचा जन्म १७ सप्टेंबर १९७८ रोजी अहमदाबात येथे झाला. शालेय जीवनापासूनच तिला अभिनयाची आवड होती. दिशा २००८ पासून सातत्याने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेत काम करीत आहे. याव्यतिरिक्त २००४ मध्ये ‘खिचडी’ व २००५ मध्ये ‘इंस्टेट खिचडी’ या शोमध्ये ती बघावयास मिळाली होती. 
Web Title: Will Taraka Mehta's reverse chashma series be bye-bye? Read the reason behind!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.