Will the in-laws to take a series of simar ki to the audience? | ​ससुराल सिमर का ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ससुराल सिमर का ही मालिका गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे अनेक चाहते आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका पुढील महिन्यात संपणार असल्याचे म्हटले जात आहे.
ससुराल सिमर का ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेत अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेच्या सुरुवातीला शोएब इब्राहिम, अविका गौर, मनीष रायसिंघानी आणि दिपीका कक्कर प्रमुख भूमिकेत होते. पण या कलाकारांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोएबने या मालिकेला रामराम ठोकला आणि त्याची जागा धीरज धूपरने घेतली तर सिमर ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दिपिकाने देखील या मालिकेला रामराम ठोकला. दिपिकानंतर किर्ती गायकवाडला आपल्याला सिमरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. किर्तीने या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबँक केला. अविका आणि मनीष यांनी देखील कित्येक महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडलेली आहे.
मालिकेत अनेक कलाकारांची रिप्लेसमेंट झाली असली तरी ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पण आता सहा वर्षांनंतर ही मालिका संपणार आहे. याविषयी या मालिकेत सिमरच्या भूमिकेत असलेली किर्ती टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राशी बोलताना सांगते, ससुराल सिमर का ही मालिका बंद होणार आहे की नाही याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या अफवा मी कित्येक दिवसांपासून ऐकत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला कलर्स वाहिनीकडून काहीही सांगण्यात येत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवणार नाही. 

Also Read : अविका गौर म्हणतेय मनीष रायसिंघानी माझ्या वडिलांच्या वयाचा
Web Title: Will the in-laws to take a series of simar ki to the audience?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.