​अभिषेक रावत घेणार तेनाली रामाची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:36 AM2018-01-27T11:36:06+5:302018-01-27T17:06:06+5:30

तेनाली रामा ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेतील तेनाली रामा, कृष्णदेवराय यांसारख्या ...

Will Abhishek Rawat take the place of Tenali Ram? | ​अभिषेक रावत घेणार तेनाली रामाची जागा?

​अभिषेक रावत घेणार तेनाली रामाची जागा?

googlenewsNext
नाली रामा ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेतील तेनाली रामा, कृष्णदेवराय यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. लहान मुलांची तर ही आवडती मालिका आहे.
अभिषेक रावत घेणार तेनाली रामाची जागा घेणार हे वाचल्यावर प्रेक्षकांचा लाडका तेनाली रामा बदलणार का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण असे काहीही नाही या मालिकेत कृष्णा भारद्वाजच तेनाली रामाची भूमिका साकारणार आहे. केवळ या मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत अभिषेक रावतची एंट्री होणार असून तो कलोरी ही भूमिका साकारणार आहे. कलोरी हा देखील तेनाली सारखा अतिशय हुशार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्याला त्याच्या हुशारीवर गर्व असून तो तेनाली रामाची जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कलोरीला राजा कृष्णदेवराय याच्यासमोर आपण किती हुशार आहे हे दाखवून द्यायचे आहे आणि दरबारातील तेनालीची जागा मिळवायची आहे, याच हेतूने तो येणार आहे. 
अभिषेक रावतने याआधी अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, सर्व्हिस वाली बहू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो तेनाली रामा या मालिकेसाठी लवकरच चित्रीकरण करायला सुरुवात करणार असून काहीच दिवसांत प्रेक्षकांना त्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
तेनाली रामा या मालिकेत कृष्णा भारद्वाजसोबतच मानव गोहिल आणि पंकज बेरी मुख्य भूमिकेत आहेत. मानव गोहिलने आजवर कहानी घर घर की, कुसूम, कसौटी जिंदगी की, सारा आकाश, बडे दूर से आये है, नागिन, अगले जन्म मोहे बिटियाँ ही किजो यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तेनाली रामा या मालिकेआधी मानव यम है हम या मालिकेत तो झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेल्या यमराज या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच पंकज बेरीने याआधी महाभारत, पेशवा बाजीराव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Also Read : तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो

Web Title: Will Abhishek Rawat take the place of Tenali Ram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.