Wild card entry will take place in Bigg Boss house of Marathi, seen glamorous version | बिग बॉस मराठीच्या घरात ही अभिनेत्री घेणार वाईल्ड कार्ड एंट्री,दिसला ग्लॅमरस अंदाज

बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून त्याची काहीच चर्चा नव्हती.अतिशय संथ पद्दतीने सुरू असलेला बिग बॉस मराठी अचानक चर्चेत आला आहे.तसेच या ना त्या कारणामुळं बिग बॉस मराठीचा पहिलाच सिझन वादाच्या भोव-यात सापडला आहे.घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद आणि यांत आणखी भर टाकण्यासाठी नुकतंच घरात वाइल्ड कार्ड एंट्री झालीय.'पुढचं पाऊल'मधील 'अक्कासाहेब' म्हणून ओळखली जाणारी हर्षदा खानविलकर घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.हर्षदाने आस्ताद काळे, जुई गडकरीसोबत 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम केले होते.याशिवाय घरातील इतर स्पर्धकांबरोबरही चांगली मैत्री आहे.त्यामुळे सध्या राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या कारनाम्यांमुळे घरातले वातावरण तापत असताना हर्षदाची एंट्रीने कोणकोणत्या घडामोडी घडणार हे पाहणेही रंजक ठरणार आहे.बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर अनेक सिझन झाले असून ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण हा कार्यक्रम हा स्क्रिप्टेड असतो असा प्रेक्षकांचा आक्षेप आहे. पण बिग बॉस मराठी देखील स्क्रिप्टेड असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात आता प्रेमकथा फुलू लागली आहे. राजेशने नुकत्याच झालेल्या भागात कॅमेऱ्यासमोर येऊन रेशमला आय लव्ह यू म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मी माझ्या पत्नीला सांगतोय की, रेशम आय लव्ह यू.... असे तो म्हणाला.रेशम आणि राजेशची प्रेमकथा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.त्यामुळे या सगळ्यावर राजेशच्या पत्नीची प्रतिक्रिया काय असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.पण राजेशची पत्नीने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.या सगळ्यामुळे राजेश आणि रेशम हे प्रेमाचे नाटक करत असून राजेश घरात जाऊन कसा वागणार याची कल्पना त्याच्या पत्नीला आधीच त्याने दिली असेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा रिअ‍ॅलिटी शो सर्वच अर्थाने वादग्रस्त ठरताना दिसत आहे. घरातील सदस्यांमधील वाद अतिशय विकोपाला जाताना दिसत असून, शोदरम्यान काही आक्षेपार्ह दृश्यही समोर आले आहेत.विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टीपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला जात असल्याचे दिसत आहे.नाशिकमध्ये एनबीटी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याने तर थेट कलर्स मराठी वाहिनीच्या सर्व संचालकांविरोधातच तक्रार करताना शोदरम्यान, प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीच्या चौकशीची मागणी केली आहे. 
Web Title: Wild card entry will take place in Bigg Boss house of Marathi, seen glamorous version
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.