That is why Mrs. Mrinal Dutt, who has gone to America, will soon return home | या कारणामुळे अमेरिकेत गेलेली मृणाल दुसानीस लवकरच परतणार मायदेशी

'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेतील जुई म्हणजेच  मृणाल दुसानिस रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली.ही मालिका देखील प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेचे अनेक चाहते आहेत. मात्र अचानक काही कारणामुळे  मृणाल दुसानीसने ही मालिकेतून एक्झिट घेत थेट अमेरिके गाठलं.मृणाल दुसानीसचे फेब्रुवारी 2016 मध्ये नीरज मोरेशी लग्न झाले होते. नीरज हा पुण्याचा असला तरी तो सध्या अमेरिकेत राहात आहे. अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या चित्रीकरणात मृणाल व्यग्र असल्याने तिला नीरजला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेऊन ती अमेरिकेला गेली आहे. सध्या मृणालचा खूप मोठा चाहता वर्ग हा भारतात आहे.त्यामुळे मृणालने असे अचानक मालिका सोडल्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. गेले काही दिवसांपासून मृणालने एकाही चाहत्यांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते. मात्र आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मृणालने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा ती लवकरच भारतात परत येणार असल्याचे तिने गुड न्युज तिच्या चाहत्यांना सांगितली. मुंबईत परत आल्यानंतर ती पुन्हा तिच्या चित्रीकरणात बिझी होणार का या चाहत्याकडून विचारलेल्या प्रश्नावर मृणालने काही उत्तर दिले नसले तरीही तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मृणाल भारतात परतल्यावर पुन्हा मालिका करणार आणखी काही दुसरे करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

सध्या मृणाल पती नीरजसह आपला क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मृणालला स्नोफॉल खूप आवडतो आणि आयुष्यात एकदातरी स्नोफॉल एन्जॉय करत असल्याचे तिने सांगितले.मालिकांमध्ये काम करणे म्हणजे वेळेला मर्यादा नाही.त्यामुळे आपल्या कुटुंबासह एन्जॉय करायला मिळत नाही. कुटुंबासह वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पती नीरजसोबत फिरणे, त्याला वेगवेगळ्या डिशेस करुन खाऊ घालणे, घराची सजावट करणे असे सर्व काम करत असल्याचे तिने सांगितले. 
Web Title: That is why Mrs. Mrinal Dutt, who has gone to America, will soon return home
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.