Why is Akshay Kumar pregnant? | ​ऐकलेत का अक्षय कुमार आहे गरोदर

अक्षय कुमार गरोदर आहे हे शीर्षक वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. अक्षय गरोदर असून त्याच्या बेबी बम्पसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अक्षयने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या नव्या कार्यक्रमासाठी हे नवे रूप धारण केले आहे आणि त्याचे हे रूप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या नव्या प्रोमोमध्ये अक्षय गरोदर असून त्याची पत्नी त्याचे सगळे लाड पुरवत असल्याचे आपल्याला दिसत आहे. एवढेच नव्हे तर या प्रोमोच्या शेवटी अक्षयला तब्बल सहा बाळं झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षयनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा प्रोमो पोस्ट केला असून या प्रोमोसोबत एक छान वाक्य देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, जग विचार करतेय की असे विचित्र कसे काय घडले आणि त्यासोबतच अपना हिरो पेट से है हा हॅशटॅग त्याने दिला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांना हा प्रोमो खूप आवडला असल्याचे त्यांनी रिप्लाय करून सांगितले आहे. 
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या याआधीची सगळीच पर्व खूप गाजली आहेत. या कार्यक्रमाने कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव, सुनील पाल, एहसान कुरेशी, नवीन प्रभाकर सारखे मातब्बर कलाकार छोट्या आणि मोठ्या पडद्याला मिळवून दिले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. 

 
Web Title: Why is Akshay Kumar pregnant?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.