Who will be the new captain of Big Boss Marathi? | कोण ठरणार बिग बॉस मराठीचा नवा कॅप्टन?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरू होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होते. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजेने हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे असे हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी बिग बॉसने कार्य दिले होते. बिग बॉसने दिलेल्या कार्यामध्ये प्रजा यशस्वी ठरली आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार? हे आजच्या भागामध्ये ठरणार आहे.
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या कार्यक्रमात कोण जिंकणार यावरून स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू आहे. आपणच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा विजेता व्हावे असे घरातील प्रत्येकाला वाटत आहे आणि त्यासाठी ते मेहनत देखील घेत आहेत. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या फायनलला आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखीनच अवघड होत जाणार आहे. त्यासाठीच ध्येयाच्या आणखीन जवळ जाण्यासाठी बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल–वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य आज सोपवले जाणार आहे. या कार्यामध्ये रेशम टिपणीस, सई लोकूर आणि नंदकिशोर चौघुले हे उमेदवार असणार आहेत. या टास्कमध्ये मेधा घाडगे आणि रेशम टिपणीस मध्ये वाद होणार आहेत. तसेच सई आणि रेशम मध्ये देखील बरीच बाचाबाची बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार यासाठी रेशम टिपणीस, सई लोकूर आणि नंदकिशोर चौघुले यांच्यामध्ये चढाओढ लागणार आहे. बिग बॉसचा नवा कॅप्टन कोण ते आजच प्रेक्षकांना कळणार आहे.

Also Read : वाचा बिग बॉस मराठी फेम ​ऋतुजा देशमुख काय सांगतेय तिच्या कार्यक्रमातील कमबॅकविषयी
Web Title: Who will be the new captain of Big Boss Marathi?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.