टायगर श्रॉफने द कपिल शर्मा शो मध्ये दिली त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 06:30 AM2019-05-04T06:30:00+5:302019-05-04T06:30:02+5:30

‘SOTY 2’ च्या कलाकारांनी कपिलच्या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर केले. यावेळी टायगरने त्याच्या पहिल्या क्रशबद्दल देखील सांगितले.

Who was Tiger's crush during his school days, revealed on The Kapil Sharma Show | टायगर श्रॉफने द कपिल शर्मा शो मध्ये दिली त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली

टायगर श्रॉफने द कपिल शर्मा शो मध्ये दिली त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देटायगरने मात्र प्रेक्षकांसमोर त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली दिली. त्याने सांगितले की, तो कॉलेजला कधीच गेला नाही. पण शालेय दिवसांत कोणा वर्गमैत्रिणीवर नव्हे तर त्याच्या शाळेतील एका शिक्षकेवर त्याचे क्रश होते.

द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. या आठवड्यात 2018 मधील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील काही कलाकार हजेरी लावणार आहेत. या चित्रपटातील नीना गुप्ता, गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा या कार्यक्रमात येणार असून खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच या भागात गुरू रंधावा त्याची अनेक हिट गाणी गाणार आहे. एवढेच नव्हे तर या आठवड्यात स्टुंडट ऑफ द इयर 2 या चित्रपटाची टीम देखील या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहे.


 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ या आठवड्यात प्रत्येक भाग अनेक प्रथितयश कलाकारांच्या उपस्थितीमुळे उत्कंठावर्धक ठरणार आहे. टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातील कलाकार उपस्थित राहून त्यांच्या विनोदी शैलीने शो मध्ये धमाल करणार आहेत. शो दरम्यान ‘SOTY 2’ च्या कलाकारांनी कपिलच्या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर केले. यावेळी टायगरने त्याच्या पहिल्या क्रशबद्दल देखील सांगितले.

कपिलने ‘SOTY 2’ च्या कलाकारांना त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयीन दिवसांमध्ये असलेल्या क्रशबद्दल विचारले. तेव्हा अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी ‘असे काही घडले नाही’ असे सांगत या विषयावर बोलायला नकार दिला. पण टायगरने मात्र प्रेक्षकांसमोर त्याच्या पहिल्या क्रशविषयी कबुली दिली. त्याने सांगितले की, तो कॉलेजला कधीच गेला नाही. पण शालेय दिवसांत कोणा वर्गमैत्रिणीवर नव्हे तर त्याच्या शाळेतील एका शिक्षकेवर त्याचे क्रश होते. हे ऐकून सेटवरील सगळ्यांनाच धक्का बसला. टायगरला अतिशय शांत मानले जाते. त्यामुळेच त्याचे त्याच्या शिक्षिकेवर प्रेम असेल ही कल्पनाच कोणी करू शकत नव्हते.
 


‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळतो. 

Web Title: Who was Tiger's crush during his school days, revealed on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.