Who is the recipient of the fame Nicita Datta? | हासिल फेम निकिता दत्ताने कोणाच्या मारली कानाखाली?

कलाकार चित्रपट, मालिकांमध्ये काम करताना नेहमीच प्रचंड मेहनत घेत असतात. मालिकेत काम करत असताना तर त्यांना दिवसातील १०-१२ तास चित्रीकरण करावे लागते. पण तरीही कोणतीही तक्रार न करता ते चित्रीकरण करत असतात. काही दृश्यांचे चित्रीकरण करताना तर कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागते. त्यातही कानाखाली मारण्याचे दृश्य हे प्रत्येक कलाकारांसाठी नेहमीच स्मरणीय ठरणारे दृश्य असते. बरेच जण हे मान्य करतील की, हे दृश्य सपशेल बिघडू शकते किंवा फारच छान होऊ शकते. बर्‍याचदा त्याच्या कडू-गोड आठवणी कलाकारांच्या आणि त्यांच्या सहकलाकारांच्या मनात कायम राहतात. हे असे काही अवघडलेले, आव्हानात्मक आणि मजेदार क्षण असतात जे प्रत्येक अभिनेत्यांच्या अनुभवास येतात.
हासिलच्या सेटवर अशाच एका दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या दृश्यात आंचल म्हणजेच निकिता दत्ता एका पार्टीत काही घटनांच्या ओघात कबीर रायचंद म्हणजेच वत्सल सेठला कानाखाली मारते असे दाखवण्यात आले. सुदैवाने हा शॉट एकाच टेकमध्ये ओके झाला असल्याने वत्सल सेठ बचावला. अशा प्रकारचे शॉट निकिता दत्ताने यापूर्वीही दिलेले आहेत. तिने या संबंधातील घडलेली एक मजेदार आठवण सांगितली. निकिता सांगते, “कोणाला कानाखाली द्यायचे हे दृश्य चित्रित करणे मला नेहमीच अवघड वाटते आणि यावेळी मी हे ठरवले होते की आपण सराव करायचा, जेणेकरून एकाच टेकमध्ये शॉट ओके होईल. अनेकवेळा असेही घडते की, आपण ठरवलेले असते त्यापेक्षा आयत्या वेळी समोरच्याला कानाखाली जोरात पडते, जे फारच लाजिरवाणे होते. पण आम्ही ते विसरून असे क्षण टाळता यावेत यासाठी अधिक सराव करण्याचा प्रयत्न करतोय. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की, हा शॉट आम्हाला हवा होता तसा चित्रित झाला आणि सर्वांनाच हायसे वाटले.”
हासिल मालिकेत झायद खान, निकिता दत्ता आणि वत्सल सेठ यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही एक बिग बजेट मालिका असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Also Read : छोट्याशा ब्रेकनंतर वत्सल सेठने पुन्हा सुरू केले हासिलचे चित्रीकरण
Web Title: Who is the recipient of the fame Nicita Datta?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.