Who has kidnapped a dog? | ​कुत्र्याचे अपहरण कोणी केले?

साथ निभाना साथिया या मालिकेच्या सेटवर सध्या कोणी कुत्र्याचे अपहरण केले याचा शोध लावला जात आहे. सेटवरील आपल्या आवडत्या कुत्र्याचे उत्कर्षा नाईकने अपहरण केल्याचे देवोलिना भट्टाचार्जीचे म्हणणे आहे आणि ती उत्कर्षाच्या विरोधात पेटामध्ये केसदेखील दाखल करणार आहे. देवोलिना सांगते, "जुगनू असे आमच्या कुत्र्याचे नाव असून तो गेली पाच वर्षं सेटवर आहे. पण काही दिवसांपासून तो सेटवरून गायब आहे. सर्वात शेवटी आम्ही त्याला उत्कर्षाच्या गाडीतून जाताना पाहिले होते त्यामुळे तिनेच कुत्र्याचे अपहरण केले असे आम्हाला वाटत आहे." पण हे सगळे चुकीचे असल्याचे उत्कर्षाचे म्हणणे आहे. उत्कर्षा सांगते, "मी कुत्र्याचे अपहरण केलेले नाही. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत आहेत. मी कुत्र्यांवर खूप प्रेम करत असल्याने मी अशी गोष्ट का करेन? जुगनू रोज माझ्या मेकअप रूममध्ये यायचा. मी त्याला खायला द्यायची. तसेच इतर लोक त्याला बांधून ठेवायचे. त्यामुळे ती गोष्ट त्याला आवडत नसल्याने तो जास्तीत जास्त वेळ माझ्या मेकअपरूममध्ये घालवायचा. मी जुगनूला गाडीतून घेऊन गेले हे खरे असले तरी मी त्याला केवळ गेटपर्यंतच घेऊन गेले होते. मला त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचे होते. त्यामुळे डॉक्टरची अपॉईंटमेंट घेण्यापूर्वी तो माझ्या गाडीत माझ्यासोबत येईल का हेच पाहाण्यासाठी मी त्याला गाडीत बसवले होते." 


Web Title: Who has kidnapped a dog?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.