Who is the 'Gossip Queen' on the set of 'What, Mr. Panchal?' | ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’च्या सेटवरील ‘गॉसिप क्वीन’ कोण?

‘स्टार भारत’वरील ((नव्या स्वरूपातील ‘लाईफ ओके’ वाहिनी) ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत आस्था अगरवाल आणि राधिका एम. या सुनांच्या भूमिका साकारणाऱ्या ओजस्वीने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. पण त्यांच्याबद्दल प्रेक्षकांना बाकी तशी फारशी माहिती नाही. या दोघीही मेहनती कलाकार असल्या, तरी सेटवर गॉसिप करण्यात त्या सर्वात आघाडीवर असतात.

सेटवरील सूत्राने सांगितले की सेटवर कुठे काय घडत आहे, त्याची बित्तंबातमी त्यांच्याकडे असते. दोन प्रसंगांच्या मध्ये किंवा फावल्या वेळेत या दोघीजणी इतरांची चेष्टा-मस्करी करताना आणि नवनवे गॉसिप सांगताना नेहमीच दिसतात. सेटवरील सर्वांशी या दोघींचे चांगले संबंध असल्यानेच त्यांना नवनव्या बातम्या कळत असतात.
यासंदर्भात आस्थाकडे चौकशी केली असता ती म्हणाली, “तुम्हाला सेटवर मी सतत राधिकाच्या सोबत दिसेन. पडद्यावर आम्ही सुना आणि बहिणी आहोत. सेटवरील सर्व घडामोडींची आम्हाला अचूक खबर असते. आमच्या दोघींमध्ये खूप घट्ट नातं निर्माण झालं असून आम्ही दोघीजणी बरीच धमाल करीत असतो.”
यासंदर्भात राधिकाने सांगितले, “हो, आम्हाला तुम्ही सेटवरील गॉसिप क्वीन म्हणालात तरी चालेल! केवळ सेटवरच नव्हे, तर जगातही काय चालू आहे, त्याची बातमी आमच्याकडे असते. आम्ही दोघीजणी उत्तम श्रोत्या असून आम्ही दुसर्‍्यांची गुपितंही कायम राखतो.”

ALSO RAED : ओजस्वी अरोराची आदर्श श्रीदेवी!

या मालिकेचे दिग्दर्शन  केदार शिंदेंनी केले आहे. केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांप्रमाणे मराठी मालिकांचे देखील दिग्दर्शन केले आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय यांसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. मराठी रंगभूमीला देखील त्यांनी लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी, सही रे सही यांसारखी दर्जेदार नाटकं दिली आहेत. मराठीतील एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Web Title: Who is the 'Gossip Queen' on the set of 'What, Mr. Panchal?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.