Who does not want Salman Khan to miss? Salman did not disclose this about ten | ​न चुकता सलमान खानची वाट कोण बघतं? याविषयी सलमानने केला दस का दममध्ये खुलासा

सलमान खान खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला सूत्रसंचालक असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. त्याचा बिग बॉस हा कार्यक्रम तर प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. सध्या तो दस का दम या कार्यक्रमात आपल्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. तो अनेक चित्रपट, कार्यक्रम, जाहिराती, दबंग टूर यांसारख्या गोष्टींमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याला आराम करायला वेळच मिळत नाहीये. तो दिवसात जेमतेम ३-४ तास झोप घेतो. त्याच्यासाठी काम आधी आणि आराम नंतर असतो. दस का दम या कार्यक्रमात चक्रधरपूरची स्नेहा राणी सिन्हा आणि दिल्लीचा नरिंदर कुमारसोबत खेळत असताना असा प्रश्न विचारण्यात आला की, भारतातील किती टक्के आई आपल्या रात्री उशिरा घरी येणार्‍या मुलाची वाट बघत असतात? या प्रश्नानंतर सलमानने एक असा किस्सा सांगितला की, सर्वांना खूप आश्चर्य वाटले. कोणत्याही आईसाठी तिचा मुलगा किंवा मुलगी कितीही मोठे झाले तरी ते लहानच असतात. आपल्या अपत्याचे योग्य संगोपन, त्याचे शिक्षण याची खातरजमा करत त्यांच्यावर चांगले संस्कार करताना प्रत्येक आई आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला सारून मुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. याविषयी सलमानने सांगितले की, तो नेहमी कामात गुंतलेला असतो आणि रात्री घरी जायला त्याला बहुधा उशीरच होतो. सलमान आपल्या आईचा लाडका मुलगा आहे. त्याची आई आज तो रात्री घरी सुखरूप येतो आहे ना याची खात्री करत खिडकीत उभी असते. त्यामुळे सलमान देखील रात्री घरी परतायचे नसेल किंवा तो प्रवास करत असेल तर आपल्या आईला ते आधीच सांगून ठेवतो. यामधून त्या दोघांमधील भावनिक बंध दृढ असल्याचे दिसून आले. सलमान कुटुंबावत्सल आहे आणि कुटुंबियांसोबत राहण्याची संधी तो कधीच वाया जाऊ देत नाही.
दस का दम या कार्यक्रमात इतकी गोड आठवण सलमानने सांगणे हे कौतुकास्पद होते. अशा रीतीने तो त्याच्यावर प्रेम करणार्‍या त्याच्या चाहत्यांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचत आहे. खिडकीशी उभे राहून आपल्या मुलाच्या घरी येण्याची वाट पाहण्याचा क्षण त्या वाट पाहणार्‍या आईसाठी आणि घरी येणार्‍या मुलासाठी नक्कीच खास असतो.

Also Read : ​सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो या चित्रपटात सोनम कपूर नव्हे तर ही अभिनेत्री दिसणार होती मुख्य भूमिकेत
Web Title: Who does not want Salman Khan to miss? Salman did not disclose this about ten
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.