The whirlwind whacking of the bright voyager in Taiwan was due to the series 'Wheeled Piya Ki' series. | तेजस्वी वायंगणकर तैवानमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन,'पहरेदार पिया की' मालिकेमुळे आली होती चर्चेत

'पहरेदार पिया की' फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकर सध्या बिग बॉस 11 व्या पर्वात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.मात्र आता आणखीण एका कारणामुळे ती चर्चेत आहे. पुन्हा एकदा कामात बिझी होण्याआधी तेजस्वी सध्या तैवानमध्ये एन्जॉय  व्हॅकेशन करत आहे. होय, तेजस्विनीने तिच्या इन्टाग्रामवर काही व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे  फोटो शेअर केले आहेत.तेजस्वीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने बिकनी घातल्याचे पाहायला मिळत असून ती रिअल लाईफपेक्षा रिल लाईफमध्ये अधिक ग्लॅमरस असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.व्हॅकेशनवर एकटी तेजस्वीच गेली नाहीय तर तिच्या बरोबर या व्हॅकेशनवर तेजस्वीसोबत 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम कांची सिंह आणि चित्रांशी रावतपण  व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तेजस्वीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये काची आणि चित्रांशी देखील मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे.तेजस्वी ‘पहरेदार पिया की’मुळे प्रकाशझोतात आली. मालिकेच्या भूमिकेपेक्षा जेव्हा मालिका वादात सापडली तेव्हा मालिकेच्या कलाकारांवरही रसिकांनी नाराजी दर्शवल्याचे पाहायाला मिळाले. तेजस्वीनीच्या ''पहरेदार पिया की'' या मालिकेत  नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यामुळे तेजस्वीनीला अधिक पब्लिसिटी मिळाली.आता सगळे वाद विसरत तेजस्वी आपले लाईफ फुल ऑन एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आता ती बिग बॉसमध्ये झळकणार आहे.त्यामुळे पुन्हा बिझी शेड्युअलमुळ तिला क्वॉलिटी टाईम स्पेंड करणे शक्य होणार नाहीय.त्यामुळेच सध्याती तैवानमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी वायंगणकरला बिग बॉसच्या 11 व्या सीजनचा भाग बनण्यासाठी अप्रोच करण्यात आले आहे. या रिअॅलिटी शोच्या मेकर्सची इच्छा आहे की तेजस्वीने या शोमध्ये सहभागी व्हावे. यासंदर्भात तेजस्वी म्हणाली की होय, ''मला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अप्रोच करण्यात आला आहे. सध्या मी या शोमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काहीच सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे. बिग बॉसच्या मेकर्सचा पूर्ण प्रयत्न आहे की तेजस्वीला याशोमध्ये घेऊन येण्याचा. तेजस्वीची मालिका नेहमीच वादात राहिली ती जर या शोचा हिस्सा बनली जर शो नक्कीच हिट होईल असे मेकर्सना वाटेय. आतापर्यंत नेहमीच वादात राहिलेल्या व्यक्तींना बिग बॉसच्या घरात  आमंत्रित केले जाते. 
Web Title: The whirlwind whacking of the bright voyager in Taiwan was due to the series 'Wheeled Piya Ki' series.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.