When the 'Salsa' is done with Aliya Bhat Marjhi Pestnaji on the stage of 'DID Little Masters'! | ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’च्या मंचावर जेव्हा आलिया भट मार्झी पेस्तनजीसह ‘साल्सा’ करते!

‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणा-या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. आता स्पर्धेच्या या टप्प्यात प्रेक्षकांनी केलेले मतदान आणि श्रोत्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी टॉप 10 स्पर्धक अटीतटीचा प्रयत्न करीत आहेत. येत्या शनिवारी, 12 मे रोजी प्रेक्षकांना एक नेत्रदीपक पर्वणी मिळेल; कारण बॉलीवूडची रूपसुंदर अभिनेत्री आलिया भट आणि विकी कौशल हे दोघेही आपल्या ‘राझी!’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’च्या व्यासपिठावर उपस्थित असतील.सर्वच स्पर्धकांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला, तरी पायल आणि कौस्तव यांनी ‘मैं तेनु समझावां की’ या गाण्यावर सादर केलेल्या बहारदार साल्सा नृत्याने केवळ चित्रांगदा सिंह, सिध्दार्थ आनंद आणि मार्झी पेस्तनजी हे तीन परीक्षकच नव्हे, तर अतिथी कलाकार आलिया भटही भारावून गेली.यावेळी पायल आणि कौस्तव यांना आलियाला या नृत्यप्रकारात सहभागी होण्यास बोलाविल्यावाचून राहावले नाही. या दोघांची साल्सा नृत्यातील सफाई आणि लालित्य पाहून भारावलेल्या आलियानेही हे नृत्य करण्यास सुरुवात केली. यावेळी तिचा जोडीदार म्हणून नृत्यदिग्दर्शक व परीक्षक मार्झी पेस्तनजी यांनीही व्यासपिठावर प्रवेश केला आणि तिला साल्साचा पदन्यास शिकविला.त्यानंतर या दोघांनी ‘मैं तेनु समझावां की’ या गाण्यावर साल्सा नृत्य केले.ऐनवेळी डान्स शिकल्यावरही आलियाने केलेले सफाईदार साल्सा डान्स पाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक थक्क झाले आणि त्यांनी तिचे खूप कौतुक केले.


cnxoldfiles/a>चित्रांगदा सिंह म्हणाली, “मी ‘बॉबी’ चित्रपट पाहिल्यावर ऋषी कपूरच्या प्रेमात पडले होते आणि त्यात तो ‘मैं शायर तो नहीं’ हे गाणे गात असताना तो जिच्यासाटी हे गाणे गातो, ती तरुणी आपणच असावं अशी माझ्या मनात तेव्हा तीव्र इच्छा निर्माण झाली होती. तेव्हापासून मला ऋषीसर आवडू लागले आणि मी त्यांचा जवळपास प्रत्येक चित्रपट पाहिला असून एक दिवस आपण ते गाणं ऋषीसरांबरोबर अनुभवावं हे माझं स्वप्न होतं.”तिची ही विनंती तात्काळ स्वीकारून ऋषी कपूरने व्यासपिठावर प्रवेश केला आणि तिच्यासोबत हे गाणे गाण्यास सुरुवात केली. 1970 आणि 80 च्या दशकात आपल्या ज्या शैलीमुळे ऋषी कपूर तरुणींचा आवडता हिरो बनला, तीच शैली त्याला आताही उत्साहाने साकारताना पाहून अन्य परीक्षक, स्पर्धक आणि प्रेक्षकांना राहावले नाही आणि त्यांनी त्याला उभे राहून मानवंदना देण्यात आली.
Web Title: When the 'Salsa' is done with Aliya Bhat Marjhi Pestnaji on the stage of 'DID Little Masters'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.