What is the secret of the black color hanging on the face of Shaniya? | शनायाच्या चेह-यावर फासलेल्या काळ्या रंगाचं गुपित काय?

छोट्या पडद्यावर सध्या 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. रसिकांमध्ये दिवसेंदिवस या मालिकेची उत्सुकता शिगेला वाढत चालली आहे. गुरुनाथ आणि शनायाचं पितळ उघडं पडल्यानंतर या दोघांनाही धडा शिकवण्याचा विडा राधिकानं उचलला आहे. सध्या याच ट्रॅकवर या मालिकेचं कथानक पुढे जात आहे. त्यामुळे राधिका-गुरुनाथ-शनायाची जुगलबंदी सध्या या मालिकेत चांगलीच रंगली आहे. दिवसेंदिवस मालिकेत येणारे ट्विस्ट आणि धम्माल कॉमेडी रसिकांना चांगलीच भावते आहे. काही दिवसांपूर्वी शनायाला एका जाहिरातीच्या शूटच्या बहाण्याने राधिका कशी अद्दल घडवते हे रसिकांनी मालिकेत पाहिलंच आहे. मालिकेच्या भागात राधिका मॉर्डन शनायाचा पूर्ण अवतारच बदलून टाकते. आता असाच शनाया म्हणजेच रसिका धबडगावकर हिचा एक आगळावेगळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. या मालिकेतील राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते हिनेच शनायाचा हा अंदाज जगासमोर आणला आहे. अनिताने सोशल नेटवर्किंग साईटवर शनाया म्हणजेच रसिकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रसिकाच्या म्हणजेच शनायाच्या चेह-यावर काळं फासल्याचं पाहायला मिळत आहे. आता रसिकाच्या चेह-यावर हे काळं कुणी फासलं याचा खुलासा तर या फोटोतून होत नाही. मात्र या फोटोमध्ये रसिकासह अनिता दाते आणि गुरुनाथची भूमिका साकारणारा अभिजीत खांडकेकर हा पाहायला मिळत आहे. तोंड काळं झालं की कुणालाही थोडं लाज वाटल्यासारखं होतं. मात्र चेह-याला काळं फासलेला हा लूक रसिका एन्जॉय करत असल्याचं हे फोटोत पाहायला मिळत आहे. याशिवाय अनिता आणि अभिजीतच्या चेह-यावरील हावभावही काहीसे हटके आहेत. त्यामुळे रसिकाच्या चेह-यावर काळं फासल्याचं कारण गुलदस्त्यातच आहे. आता रसिकाची मालिकेच्या सेटवर तिच्या सहकलाकारांनी गंमत केली की हा मालिकेचा भाग आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र माझ्या नव-याची बायको मालिकेतील सध्याचं कथानक पाहता हा रसिकाचा हा लूक म्हणजे मालिकेच्या एखाद्या भागातील सीन असावा अशी शक्यता नाकारता येत नाही.

Also Read:फोटोत दिसणारी कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री,जिचा लूक ठरतोय लक्षवेधी

Web Title: What is the secret of the black color hanging on the face of Shaniya?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.