What is the relationship called 'Ronit Roy' in this role? | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मालिकेत रोनित रॉय झळकणार या भूमिकेत?

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून मिस्टर बजाज या भूमिकेने घराघरात पोहचलेला रोनित रॉय आता लकरच  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत एंट्री करणार आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करुन आहेत.दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.अलीकडेच सुहानाच्या व्यक्तिरेखेद्वारे अभिनेत्री कृतिका शर्माचा प्रवेश झाला होता.त्यानंतर आता आता लवकरच सुहानाच्या कुटुंबियांचाही मालिकेत प्रवेश होणार असून तिच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता रोनित रॉय झळकणार आहे.रोनितची मालिकेत एका पाहुण्या कलाकाराची भूमिका असली तरी या भूमिकेसाठी लोकप्रिय चेह-याच्या शोधात निर्माते होते.रोनित रॉयची लोकप्रियता खूप आहे.त्यानुसार त्याचे लोकप्रियता इनकॅश करण्याचा निर्मात्यांनी या भूमिकेद्वारे प्रयत्न केला आहे.रोनित रॉयच्या मालिकेतील एंट्रीने ही मालिकेत एक नवीन रंजक वळण रसिकांना पाहायला मिळणार आहे.


'कसौटी जिंदगी की'या मालिकेने रोनित रॉयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.आज रोनित छोट्या पडद्यावरचा सर्वात यशस्वी आणि सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे.'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील ऋषभ बजाज ही त्याची भूमिका केवळ आठ आठवड्यांची असणार असे ठरले होते. पण रोनित रॉयने त्याच्या दमदार अभिनयाने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे सादर केली.अल्पावधीतच या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यामुळे या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने ऋषभ बजाज ही भूमिका मालिकेत कायम ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला होता.

छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.2 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत.केवळ सर्वात जास्त काळ सुरु असलेली मालिकाच नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.हा रेकॉर्ड झाल्यानं ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश होती.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेकडून टक्कर मिळत आहे.
Web Title: What is the relationship called 'Ronit Roy' in this role?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.