What is this relation with Akshay Kumar? The team has to rehearse the rehearsal | ​अक्षय कुमारने ये रिश्ता क्या कहलाता है च्या टीमला करायला लावली रिहर्सल

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी अक्षय आणि भूमी सोडत नाहीयेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय आणि भूमी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर नुकतेच गेले होते. या मालिकेत सध्या नक्ष आणि किर्तीच्या लग्नाची तयारी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या लग्नाच्या सिक्वलमध्ये काहीही कमी पडू नये यासाठी मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा या मालिकेच्या सेटवर आले होते. शाहरुख, अक्षयसारखे स्टार आपल्या मालिकेच्या सेटवर येत असल्याने सध्या या मालिकेची टीम चांगलीच खूश आहे. 
अक्षयने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या टीमसोबत चित्रीकरण केले असता या मालिकेच्या टीमला एक वेगळाच अनुभव मिळाला. या मालिकेच्या सेटवर पोहोचल्यानंतर अक्षयने संपूर्ण टीमला दृश्यांची तीन वेळा तालीम करायला लावली. अक्षयने सांगितल्यामुळे मालिकेतील सगळेच आनंदाने तालीम करत होते. पण अक्षयने असे का करायला सांगितले हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण अक्षयला कसे विचारावे हे कोणालाच कळत नव्हते. मात्र ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या टीमला काहीच वेळात याचे उत्तर मिळाले. 
चित्रीकरण लवकरात लवकर आटपावे यासाठी अक्षयने सगळ्यांना तालीम करायला सांगितले होते. अक्षयने सगळ्यांना तालीम करायला लावल्याने केवळ एका टेकमध्ये चित्रीकरण पूर्ण झाले. अक्षयसोबत चित्रीकरण करण्यासाठी जवळजवळ तीन तास लागेल असे सगळ्यांना वाटले होते. पण अक्षयने वापरलेल्या युक्तीमुळे केवळ ४५ मिनिटांत चित्रीकरण आटपले. 

Also Read : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर शाहरुख आणि अनुष्कासह अवतरला हा पाहुणा!
Web Title: What is this relation with Akshay Kumar? The team has to rehearse the rehearsal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.