'What is this love?' | 'ये प्यार नहीं तो क्या है'मधली पलक जैन आहे चहाची चाहती !

प्रत्येकाची पेय पिण्याची आवड वेगवेगळी असते, थंड किंवा गरम ज्यामुळे त्यांना ऊर्जावान वाटते आणि दिवसभर ते ताजेतवाने राहतात. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ये प्यार नही तो क्या है मधील पलक जैन संपूर्ण दिवस उत्साहाने घालवण्यासाठी तिच्या आवडीच्या पेयावर विसंबून असते. या अभिनेत्रीला पडद्यावर कॉफीची चाहती म्हणून दाखवले जाते मात्र प्रत्यक्षात ती चहाचीच अस्सल चाहती आहे. इतकेच काय तर पलकने स्वत:साठी आल्याच्या चहाची वेगळी कृती सुद्धा शोधून काढली आहे आणि ती तिचाच वापर करते.

चहाच्या तिच्या प्रेमाविषयी तिला विचारले असता ती म्हणाली, “मी पूर्णपणे चहाची भक्त आहे. मी घरी असताना माझ्यासाठी आल्याचा चहा बनवते. विशेषत: हिवाळ्यात, त्याची मला सवयच लागली त्यामुळे मी स्वत:चीच कृती बनवण्याचे ठरवले. भन्नाट ऊर्जावान मसाला चहा बनवण्यासाठी मी थोडे आले, वेलची, चिमुटभर काळी मिरी आणि तुळशीची पाने एकत्र करते आणि हिवाळ्यासाठी सर्वोत्तम असलेला चविष्ट तरीही आरोग्यप्रद असा माझा चहा तय्यार होतो!

उल्लेखनिय म्हणजे आगामी ट्रॅकमध्ये कथा सिद्धांत आणि अनुष्काच्या भूतकाळात म्हणजेच कॉलेजच्या दिवसांमध्ये जाणार आहे. येथे, सिद्धांतच्या चविष्ट चहा बनवण्याच्या आवडीमुळे अनुष्का सुद्धा आपल्या कॉफीच्या आवडीपासून चहाची भक्त बनण्याकडे चालू लागते. तसेच या घटनाक्रमासाठी पलकने आपली विशिष्ट चहाची पाककृती बनवली आहे. मात्र, ही अभिनेत्री उन्हाळ्यात चहाचे सेवन टाळते. ती म्हणाली, “उन्हाळ्यात मी चहा टाळण्याचाच प्रयत्न करते, मात्र सकाळी चहाचा गरम कप घेतल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही, तो आवश्यकच आहे. चहा माझ्यासाठी प्रेरणाच आहे.”

पलक जैनची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का रेड्डीने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. मालिकेच्या निमित्ताने तिला भरतनाट्यमसाठी काही कार्यशाळांमधून शिक्षण घ्यायला मिळाले. हा डान्सप्रकार शिकायला अनुष्काला खूप कठीण गेल्याचे तिने सांगितले. 
Web Title: 'What is this love?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.