What happened in the Big Boss house on October 10. Click to learn | काय घडले 10 ऑक्टबरोला बिग बॉसच्या घरात.. जाणून घेण्यासाठी क्लिक करा

रेश्मा पाटील

10 ऑक्टोबरला आपण बघतिले शेजारी बिग बॉसच्या घरात आले आहेत. आपल्याला माहितीच आहे की ते फॅमिली म्हणून घरात आले आहेत. प्रत्येक शेजारी बिग बॉसच्या घरातील स्पर्धाकांना स्टोरी देऊन प्रॉपर्टीबाबत कनव्हेस करताना दिसले. घरातील माताजी म्हणजेच शिवानी दुर्गा यांना त्यांच्या खोट्या स्टोरीबाबत डाऊट आला आहे. बिग बॉसच्या घरातील हवा आज वेगळ्याच दिशेने वाहताना दिसली. हिना आणि विकास जे नेहमी एकमेकांच्या सोबत असायचे त्यांच्यामध्ये आज जोरदार भांडणे झाली. विकास गुप्ता पुनीतचा अपमान करतो. पुनीत आपल्या फॅमिलीच्या जोरावर उड्या मारतो आहे असे विकास म्हणतो. त्यामुळे चिडलेले पुनीत ही विकासला म्हणतो तो एक फ्रॉड आहेस तुझ्या कॉस्टिंग कॉचबाबत सगळ्यांच माहिती आहे. विकासला हे सांगितले जाते शिल्पाला त्रास देण्याची एक ही संधी तो सोडत नाही. हिनाने विकासाला अनेक वेळा शिल्पापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. पण विकास संधी मिळातच शिल्पाला त्रास देतो. या छोट्याशा कारणामुळे  विकास आणि हिनामध्ये झालेले भांडण खूप लांबपर्यंत जाते. विकास यामुळे दुखी होतो की, घरातला प्रत्येक सदस्या त्याच्यावर ओरडून दाखवतो आहे. तसेच तो भावनिकसुद्धा होतो. त्यानंतर विकास स्वत:ला बाथरुम मध्ये लॉक करुन घेतो आणि तो ढसाढसा रडायला लागतो. शिल्पाने यावेळी विकासाला त्रास देण्याची संधी सोडली नाही. ती विकासच्या मागे गेली आणि बाथरुम बाहेर उभी राहुन विकासला आठवण करुन देत होती तिला मालिकेतून कसे विकासमुळे बाहेर काढण्यात आले. यानंतर वर्षभर तिच्यावर सुद्धा रडायची वेळी कशी आली होती. विकासने निर्मात्यांना हेही सांगितले होते कि उपाशी राहण्याची वेळ आली की परत येईल. त्यादिवसाच आठवण शिल्पाने विकासला करुन दिली.  टॉयलेटमध्ये बसून विकास ये लोग सब गंदे है असे बोलताना दिसला. हे सगळे बघून असा अंदाज लावण्यात येतो की विकास गुप्ताला या आठवड्यात घरातील सदस्यांनी नॉमिनेट केले आहे. याआधीच्या बिग बॉसमध्ये सुद्धा आपण हे बघितलेले आहे. गौतम गुलाटीला जेव्हा नॉमिनेट करण्यात आले होते. तेव्हा रडताना आणि एकटाच बडबडताना दिसला होता. पण त्यानंतर त्या सीझनचे विजेतेपद गौतमने पटाकवले होते. त्यामुळे विकासुद्धा सहानभुती पटाकवून वोट्स जमा करेल. या आठवड्यात स्वत:ला वाचण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतो आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही  अर्शी खानसुद्धा या सगळ्या वातावरणाची मजा घेतली. यानंतर विकास कंटाळून स्मोकिंग रुममधून बाहेर पडून बिग बॉस हाऊसच्या बाहेर जातो. पण बिग बॉस टीम त्याची समजूत काढून पुन्हा त्याला घरात आणते. काल लक्झरी बजेट बरोबर सदस्यांना एक टास्क ही देण्यात येतो. टास्का असा होता की हितेन हा एक राजा आहे. त्याच्या दोन राण्या आहेत शिल्पा आणि अर्शी. कालचा दिवस शिल्पा आणि अर्शीचा होता असे म्हणावे लागले. या दोघांनी हे सिद्धा करायचे आहे की त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त चांगली राणी कोण आहे. यानंतर बिग बॉस दोघींना एक वैयक्तिक टास्क देतो कि शिल्पा ही एक चांगली राणी आहे आणि अर्शी ही एक वाईट राणी आहे. अर्शीला बिग बॉस सांगतो, घरातील सदस्यांनसमोर तुला चांगलं वागून त्यांना त्रास द्यायचा आहे. शिल्पा आणि अर्शी हितेन बरोबर खूप मजा करताना दिसल्या. शिल्पाने हितेनला सांगितले आम्ही तुला बॅक मसाज देतो. हितेन यामुळे काहीसा ऑक्वर्ड परिस्थिती दिसला. हसू कि रडू हे त्याला नक्की कळत नव्हते. तर अर्शी त्याला राजा तुझे क्या चाहिये हे विनोदी अंदाजात विचार होती. त्यामुळे हितेनला कुठे जाऊन जीव देऊ असे झाले होते. घरातील इतर सदस्य दोन टीममध्ये विभाजित झाले होते. काही सदस्य शिल्पाच्या टीममध्ये होते तर काही सदस्य अर्शीच्या टीममध्ये. जो हुकुम शिल्पा किंवा अर्शी देईल तो त्यांना ऐकावा लागत होता. अर्शीने सपनाला सांगितले माझे पाय दुखत आहेत तर ते चिपून दे. यानंतर सपनाचा चांगलाच पार चढला आणि ती अर्शीच्या अंगावर धावून गेली. यानंतर राजा हितेनने तिची समजूत काढली आणि सपनाने रडत रडत अर्शीचे पाय चेपले. सपनाला हा सगळा प्रकार फारच अपमानास्पद वाटला. पण हितेनने तिची समजूत काढली हा एक टास्क आणि तो त्यांनी पॉझिटिव्हली पूर्ण केला पाहिजे. फायनली आजचा दिवस संपताना पुनीत आणि बंदगी हीने एक खेळी मांडली की काही झाले तरी रिएक्ट व्हायचे नाही.  बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून आपल्या वेगवेगळ्या जोड्या दिसत आल्या  आहेत. आर्यन वैद्य- अनुपमा वर्मा, राहुल महाजन- पायल रोहतांगी, वीणा मलिक आणि अश्मित पटेल, गौरह खान- कुशाल टंडन, तनिषा मुखर्जी- अर्मान कोहली, गौतमी गुलाटी आणि डायना. पुनीश आणि बंदगी एकमेकांच्या खूप जवळ दिसले. कदाचित पुनीश आणि बंदगीला हे माहिती नाही आहे की प्रेक्षकांना हे बरोबर कळत की तुमची घरात टिकून राहण्याची ही एक खेळी आहे. बिग बॉस हाऊसच्या बाहेर आल्यानंतर आतपर्यंत कोणतेच नातं टिकले नाही आहे तसेच यांचे ही टिकेल असे वाटत नाही. तरीही ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसले.        


(रेश्मा पाटीलने बिग बॉसच्या घरातील या घडामोडी टिपल्या असून ती बिग बॉसची मोठी फॅन आहे. तिने आजवर कधीच कोणत्याच सिझनचा कोणताच भाग मिस केलेला नाही.) 
Web Title: What happened in the Big Boss house on October 10. Click to learn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.