What did Anil Kapoor call his wife after Madhuri? | ​अनिल कपूरने त्याच्या पत्नीला माधुरी या नावाने हाक मारल्यानंतर काय होती तिची प्रतिक्रिया

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी रात्री 8.30 वाजता प्रसारित होत असलेल्या दस का दम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गंमतीशीर कोट्यांनी, आपल्या मोहिनीने आणि विचार करायला लावणार्‍या प्रश्नांनी दमदार सलमान प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सामान्य माणसांच्या या कार्यक्रमाने आपल्या बॉलीवूड कलाकारांना देखील भुरळ घातली आहे. नुकतेच या कार्यक्रमाच्या सेट्सवर रेस 3 चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी आले होते. सलमानचे आपल्या सह-कलाकारांशी संबंध घट्ट असल्याचे उघड दिसत होते. अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, डेझी शाह आणि साकीब सलीमसोबत सलमान खूप मस्ती करताना दिसला.
खेळ सुरू असताना ‘किती टक्के भारतीय आपल्या पत्नीला वेगळ्या नावाने हाक मारतात?’ या प्रश्नावर अनिल कपूरने दिलेल्या उत्तराने सर्व कलाकार आणि उपस्थित प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाली. आपल्या विनोदी आणि गंमतीशीर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अनिल कपूरने हे कबूल केले की, एक काळ असा होता की, तो आपल्या पत्नीला माधुरी म्हणत असे. याबाबत अनिल कपूरने सांगितले की, त्यावेळी तो इतका सतत माधुरीबरोबर काम करत होता की, त्याला त्याची चूक लक्षातच येत नसे. पत्नीने दाखवलेल्या संयमाबद्दल त्याने तिचे कौतुक केले. ती त्याच्या कामाचे स्वरूप जाणून होती आणि त्यामुळे ती या गोष्टीमुळे चिडत नसे तर उलट ती त्याचा मोठा आधार होती. हा तोच काळ होता, जेव्हा अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित ही नव्वदच्या दशकातील हिट जोडी होती आणि त्या दोघांनी अनेक यशस्वी चित्रपट एकत्र केले होते.
दस का दम या कार्यक्रमात रेस 3 च्या कलाकारांनी सलमानसोबत खूप धमाल केली. त्यांचे एकमेकांशी असलेले ट्युनिंग लगेचच दिसून येत होते आणि आपल्या सह-कलाकारांचे आतिथ्य सलमानने छान पद्धतीने केले. अनिल कपूरने आपल्या पत्नीची तोंड भरून स्तुती केली आणि त्याला दिलेल्या आधाराबद्दल तिचे आभारही मानले.

Also Read : ​सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाच्या सेटवर स्पर्धकाला दिले हे वचन
Web Title: What did Anil Kapoor call his wife after Madhuri?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.