On the way to Zia TV's Pia Albale, Beauty and the Beast | ​झी टीव्हीवरील पिया अलबेला जाणार ब्युटी अॅन्ड दि बीस्टच्या मार्गाने

झी टीव्हीवरील वीकेन्ड शो सुपरहिट्‌सच्या आगामी भागामध्ये पिया अलबेलाचे प्रमुख कलाकार दिसून येणार आहेत. एक तासाचा हा खास भाग प्रेक्षकांसमोर पिया अलबेलाची कथा ब्युटी अॅन्ड दि बीस्टच्या कथानकानुसार घेऊन जाईल. यात नरेन (अक्षय म्हात्रे) बीस्ट म्हणजेच राक्षसाच्या रूपात तर पूजा (शीन दास) संकटात पडलेल्या सौंदर्यवतीच्या रूपात दिसून येईल. या कथानकानुसार, नरेन आणि पूजाचे अतिशय कडाक्याचे भांडण होते आणि परिणामी, पूजाची शुद्ध हरपते आणि मग घडतात अनेक घटना. तेव्हाच आनंद (सूरज कक्कर) देवदूत बनून येतो आणि पूजासोबत वाईट वागल्याबद्दल नरेनला रागावतो. नरेन पूजाला पुन्हा कधीच प्राप्त करू शकणार नाही आणि तिचे प्रेम त्याला कधीच मिळणार नाही असा शापही तो नरेनला देतो. तो नरेनला एका उलट पेल्यामध्ये गुलाबाचे फूल देतो आणि त्याला सांगतो की गुलाबाच्या सर्व पाकळ्‌या गळून पडेपर्यंत त्याच्याकडे पूजाला जिंकण्याचा वेळ आहे.
या घडामोडींमध्ये नरेनची राक्षसी आणि क्रूर बाजू त्याच्यावर ताबा घेते आणि तो स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतो. तो पूजाला पिंजऱ्यात बंद करतो आणि तिच्यासोबत वाईट वागतो. मात्र, जसजसा काळ पुढे सरकतो, नरेन शांत होतो आणि त्याला पुन्हा एकदा पूजाबद्दल प्रेम वाटू लागते. आपल्या या लूकबद्दल अक्षय सांगतो, “सुपरहिट्‌स भागासाठी माझा अतिशय भयानक असा लूक आहे. कथानक ब्युटी अॅन्ड दि बीस्टसारखे असून त्यात थोडा टि्‌वस्ट आहे. मला ही राक्षसी भूमिका ऑनस्क्रीन साकारायला आवडली आणि ही क्रूर, खलनायकी भूमिका साकारताना मला विभिन्न भावनांचा अनुभव आला. त्याशिवाय हे सगळे रूपांतरण नरेनच्या दृष्टिकोनातून साकारणेसुद्धा मला आवडले. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझा याआधी कधीही न पाहिलेला अवतार आवडेल आणि ते माझे कौतुक करतील.” नरेन पूजाला आपल्या प्रेमात पाडू शकेल का? तसेच या शापातून त्याची कधी मुक्तता होईल? याची उत्तरे सुपरहिट्‌स पिया अलबेला स्पेशलमध्ये प्रेक्षकांना ९ आणि १० जून रोजी रात्री ८ वाजता झी टीव्हीवर मिळणार आहेत. 

Also Read : हिंदीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय म्हात्रे पहिल्यांदाच दिसणार मराठीत
Web Title: On the way to Zia TV's Pia Albale, Beauty and the Beast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.