Water, emotional Rahul's 'This' story will bring a thorn on your body as I have heard from the eyes of Confidence High. | मला कॉन्फिडोन्स हाय म्हणणा-या राहुल्याच्या डोळ्यातून टचकन आलं पाणी,भावनिक राहुलची 'ही' कहाणी तुमच्या अंगावरही काटा आणेल

छोट्या पडद्यावरील 'लागीर झालं जी' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे.आर्मीचे प्रशिक्षण घेणारा अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकहाणी बहरत चालली आहे.त्यामुळे रसिकांना मालिका अधिकच भावते आहे.अजिंक्य आणि शीतलसह मालिकेतील इतर कलाकारांचे अभिनयसुद्धा रसिकांवर जादू करत आहे.यातील राहुल्याची तर बातच न्यारी.बोलण्याची अनोखी लकब आणि चेह-यावरील भाव यामुळे या मालिकेतील राहुल्या रसिकांचा लाडका बनला आहे.'मला लय कॉन्फिडोन्स हाय,भितूय का कुणाला' असे हटके डायलॉग थेट गावरानी ठसका आणि चेह-यावर विशेष भाव आणून बोलणारा राहुल्या या मालिकेत भलताच भाव खाऊन जातो.अज्या आणि विक्याचा मित्र,दोघांप्रमाणे तोही आर्मीत जाण्यासाठी इच्छुक असतो.मात्र स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाल्यावर राहुल्या माघार घेतो हे सा-यांनीच पाहिलं आहे.सगळ्यांना हसवणा-या आणि दिलखुलास मनोरंजन करणारा राहुल्या रिअल लाइफमध्ये तितकाच हळवा आणि संवेदनशील आहे.राहुल्याचे रिअल नाव राहुल मकदुम असं आहे.  मालिकेत आर्मीचे जीवन प्रत्यक्ष अनुभवण्याची राहुल्याची संधी हुकली असली तरी आर्मीतील जीवन कसं असतं,आर्मीत गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची काय अवस्था असते याची राहुल्याला जाणीव असून त्याने ती गोष्ट रिअल लाइफमध्ये अनुभवली आहे.कारण राहुल्याचे वडिल हेसुद्धा आर्मीत होते.सध्या ते रिटायर झाले असले तरीसुद्धा आर्मीत राहणाऱ्या माणसांचे आयुष्य काय असते हे राहुल्याने अनुभवले आहे.वडील आर्मीत असल्याने बालपणी राहुल्याची काय अवस्था झाली असेल,त्याच्या मनाची काय अवस्था असेल हेच सांगणारा एक व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडीओमध्ये राहुल्याला डोळ्यात टचकन पाणी आल्याचे पाहायला मिळालं होतं.या व्हिडीओत एक लहान मुलगाही होता.खरं तर त्यालाच पाहून राहुल्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.तो मुलगा एका फौजीचा मुलगा होता.त्याला पाहून राहुल्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं बालपण आलं.या मुलाची काय अवस्था असेल याच विचाराने राहुल्याला अश्रू अनावर झाले.सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं आणि सा-या भारतीयांचे फौजी रक्षण करत असतात.त्यांच्या त्यागामुळेच आपण आपलं जीवन आपल्या लाडक्या आईवडिलांसह जगत असतो.मात्र फौजीचा लेक बालपणी आपल्या वडिलांच्या प्रेमाला मुकतो.प्रत्येक फौजी पुत्राची हीच अवस्था असते.हाच विचार त्या मुलाला पाहून राहुल्याच्या डोक्यात आला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं.आपल्या वडिलांची आठवण, बालपणी होणारी मनाची घालमेल सारं त्यांच्या डोळ्यासमोर आलं. मात्र वडिलांविना त्यांची मुलं कशी जगत असतील हा विचार राहुल्याला अस्वस्थ करुन गेला.त्यामुळे या व्हिडीओमध्ये सा-यांना हसवणा-या राहुल्याचा भावनिक चेहरा पाहायला मिळाला.(Also Read:'लागिरं झालं जी' मधील अज्या म्हणजेच नितीश चव्हाणचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का) 
Web Title: Water, emotional Rahul's 'This' story will bring a thorn on your body as I have heard from the eyes of Confidence High.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.