This was the fourth day of Big Boss Marathi house artist! | असा होता बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा चौथा दिवस!

बिग बॉस मराठीच्या घरातील सुरुवात तशी शांततेच झाली.मेघा आणि जुई किचनमधील धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे.बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा बिग बॉसने केली, नॉमिनेट सदस्यांना सदईच्छा देण्यासाठी हा यज्ञ आयोजित केला.हा टास्क रात्रभर चालला.आस्ताद काळेने हा टास्क उत्तमरीत्या पार पाडून बाजी मारली, त्याच्या बरोबर पुष्कर जोग, भूषण कडू याने देखील चांगल्या प्रकारे हा टास्क पार पाडला. या टास्कच्या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये आस्ताद काळेने केलेल्या आरोपामुळे मेघाला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळले. कारण, आस्तादचे म्हणणे आहे, कि मेघाने आम्हाला प्रोत्साहन न देता ती निघून गेली.आस्तादने मेघावर नव्हे तर संपूर्ण टीम वर आपली नाराजगी व्यक्त करणार आहे. 

 
ऋतुजा, उषा आणि विनिता या तिघांमध्ये सकाळी सकाळी नॉमिनेशवर रंगलेली चर्चा बघायला मिळणार आहे.उषा नाडकर्णींना कोणी कोणी नॉमीनेट केले आहे हे सांगणार आहेत.अनिल थत्ते यांनी स्वत:ला बिग बॉसच्या घरातील नारदमुनी म्हंटले कारण त्यांना प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तसेच त्यांनी आरती मनाने चांगली असल्याचे तसचं मेघाने आयुष्यामध्ये खूप काही सहन केल्याचे बिग बॉसला सांगणार आहेत.बिग बॉसच्या घरामध्ये आल्यावर प्रत्येकालाच जिंकण्याची इच्छा असते, अशीच इच्छा मेघा धाडेची असून ती स्वत:ला टॉप 5  मध्ये बघते असे सांगणार असून तिच्याबरोबर ती अजून कोणाला बघू इच्छिते हे देखील सांगणार आहे.

 
विनीत भोंडे अनिल थत्ते यांना असं काय बोलला ज्यामुळे अनिल थत्ते यांना खूप राग आला आणि संपूर्ण टीम समोर त्यांनी त्याचा पाण उतारा केला.बिग बॉस मराठीच्या घराचा पहिला कॅप्टन झाल्यानंतर विनीतच्या बोलण्यामध्ये आलेला फरक घरातील सदस्यांना खटकत आहे.अनिल थत्ते आपले मनोगत व्यक्त करत असताना विनीतने त्यांना दोनदा थांबवले ज्याचा त्यांना खूप राग आला. आणि अचानक कॅप्टन झाल्यामुळे विनीतच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याला वरीष्ठांशी कसे बोलावे हे देखील कळत नाही असे घरच्यांचे म्हणणे आहे.

 
सई लोकूर आणि पुष्कर मध्ये चांगली मैत्री होत असल्याचे प्रेक्षकांना बघायला मिळणार असून, घरामध्ये फक्त पुष्करला ती आपल्या मनातील गोष्टी सांगू शकते असे देखील पुष्करला सांगणार आहे. तसेच सईने पुष्करला सुशांत शेलारवर ती नाराज असल्याचे सांगणार आहे पण नक्की असे काय घडले ? ती का नाराज आहे ? आस्ताद उषा नाडकर्णींवर का चिडला ? हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
Web Title: This was the fourth day of Big Boss Marathi house artist!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.