Visit to the show's set by Superstars for the promotion of 'Race 3' | 'रेस 3' च्या प्रमोशनसाठी य सुपरस्टार्सने दिली या शोच्या सेटला भेट  

डान्सिंग रिअॅलिटी शो 'डीआयडी लिटिल मास्टर्स'ने आपल्या हटके कल्पनेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. दर आठवड्याला त्यांचे गुणी स्पर्धक ‘ब्लॉकबस्टर’ कला सादर करत असतात.आता हे जिगरबाज स्पर्धक कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी तयार झाले आहेत.फिनाले जसजसा जवळ येत चालला आहे आणि स्पर्धा जसजशी अधिक तीव्र होत चालली आहे, अव्वल सहा स्पर्धक मंच दणाणून सोडण्यासाठी आणि श्वास रोखून धरणारे सादरीकरण करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत.या आठवड्याच्या अखेरीस, मनोरंजन शिगेला पोहोचेल कारण नृत्यकलेत पारंगत असलेले तरुण 'रेस ३' चे कलाकार, अर्थात सलमान खान, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, साक़िब सलीम, रेमो डिसूझा आणि डेझी शहा, यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील.  

या शोची सुरुवात अतिशय दणक्यात झाली. फक्त हे लिटील मास्टर्सचच नव्हे, तर त्यांच्या मॉमनेही त्यांच्या  नृत्यकलेला न्याय दिला आणि खुद्द सलमान समोर आपल्या केलेचे सादरीकरण केले.आपण आपल्या मुलांपेक्षा अजिबात कमी नाही हे दाखवून देताना स्पर्धक उर्वा, मन आणि जिया यांच्या आयांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले आणि ह्या सुपरस्टार बरोबर त्याच्या ‘देखा है पहली बार’, ‘दिल दिवाना’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मौसम का जादू’ आणि ‘मेरे रंग में रंगनेवाली’ ह्या आणि इतर  लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर केले. ह्या कृत्यामुळे सलमान चक्क लाजला आणि ह्या आयांच्या फौजेचे त्याने इतके मनोरंजक आणि उर्जावान सादरीकरण केल्याबद्दल कौतुकही केले.                

त्याचबरोबर 'रेस 3' चे सर्व कलाकार ब्लॉकबस्टर मुलांबरोबर यथेच्छ मजा करताना दिसत होते. छोट्या उर्वाने बॉबी देओल आणि सलमान खान ला सायकलीवर शर्यत लावण्याचे आव्हान दिले तर डेझी शहाने आपले गुजरातीवरचे प्रभुत्व दाखवताना सलमान खानच्या सिनेमांची नावे मजेशीरपणे गुजरातीत सादर केली. कलाकारांनीही आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या आणि लहानपणी केलेल्या मस्तीबद्दल सांगितले.तुडुंब मनोरंजन आणि धमाकेदार सादरीकरणाने भरलेला डीआयडी लिटिल मास्टर्सचा आगामी भाग प्रेक्षकांना दूरचित्रवाणी संचासमोरून हलू देणार नाही.  

Web Title: Visit to the show's set by Superstars for the promotion of 'Race 3'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.