Vikrant will be proven successfull that Isha is the rebirth of Rajanandini in Tula Pahate re Serial ? | 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेने रचलाय हा कट, त्यात तो होईल का यशस्वी? पाहा हा Video
'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेने रचलाय हा कट, त्यात तो होईल का यशस्वी? पाहा हा Video

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आणि अल्पावधीतच 'तुला पाहते रे' ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली. मात्र आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आल्यामुळे या मालिकेबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढली आहे. 

सामान्य घरातील ईशा निमकर सरंजामे कुटुंबात लग्न करून आली आणि ती या घरात हळूहळू रुळते आहे. सगळे सुरळीत चालू असताना आता मालिकेत एक रंजक वळण आले आहे. विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र विक्रांतचा हा स्वभाव प्रेक्षकांना संभ्रमात टाकतो आहे. प्रसारीत झालेल्या भागात विक्रांत सरंजामेचे ईशावर प्रेम नसून त्याने प्रॉपर्टी बळकावण्यासाठी ईशाशी लग्न केल्याचे समोर येते. तो त्या भागात झेंडेंना सर्व प्लान समजावून सांगताना दिसतो. विक्रांतच्या नव्या प्लानमध्ये तो सरंजामे कुटुंबाला ईशा हीच राजनंदिनी असल्याचे भासविणार आहे आणि घरातल्यांचा त्यावर विश्वास बसल्यानंतर आईसाहेब त्यांची सर्व संपत्ती ईशाच्या नावावर करतील आणि मग ईशा विक्रांत सरांच्या नावावर संपत्ती करेल. असा कट विक्रांतने आखला आहे. आता यात विक्रांत यशस्वी ठरेल की त्याचा हा खरा चेहरा ईशा व आईसाहेबांसमोर येईल का, हे आगामी भागात स्पष्ट होईल. 


विक्रांत सरंजामे व झेंडेचा खरा हेतू प्रेक्षकांसमोर आला असला तरी अखेर काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. 


Web Title: Vikrant will be proven successfull that Isha is the rebirth of Rajanandini in Tula Pahate re Serial ?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.