विक्रांत सरंजामे ईशा निमकरला या दिवशी करणार प्रपोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 08:00 AM2018-11-25T08:00:00+5:302018-11-25T08:00:00+5:30

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

Vikrant Saranjame will propose to Isha Nimkar on this day | विक्रांत सरंजामे ईशा निमकरला या दिवशी करणार प्रपोझ

विक्रांत सरंजामे ईशा निमकरला या दिवशी करणार प्रपोझ

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची रोमँटिक केमिस्ट्री भावतेय प्रेक्षकांना


झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. वय विसरायला लावणारी आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे व नवोदीत अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत आहेत. 


विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते आहे. सध्या विक्रांत आणि इशाच्या प्रेम कहाणीत बरेच चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात इशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे.  तेव्हा या अडचणी पार करत विक्रांत इशाचे मन कसे जिंकणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
विक्रांत आणि इशाची ही प्रेमकहाणी आता लवकरच पुढच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. विक्रांत इशाला प्रपोज करणार आहे. या विशेष भागासाठी मालिकेचे निर्माते तारीख ठरवत आहेत. विक्रांत आणि इशा यांनी बऱ्याच वेळा एकमेकांकडे अप्रत्यक्षपणे प्रेम व्यक्त केले आहे. पण आता विक्रांत आपल्या खास अंदाजात इशाला प्रपोज करणार आहे. चाहत्यांना हा विशेष एपिसोड येत्या ९ डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. रविवारी ९ डिसेंबर रोजी एक तासाचा विशेष एपिसोड प्रसारित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. त्यामुळे विक्रांत इशाला कशा पद्धतीने प्रपोझ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 

Web Title: Vikrant Saranjame will propose to Isha Nimkar on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.