सिनेमाचे प्रमोशन करायचे म्हटलेवर 'द कपिल शर्मा' या शोमध्ये बॉलिवूडचे स्टार हजेरी लावणार नाही हे तर शक्यच नाही. त्यामुळे सिनेमाचे प्रमोशनसाठी बॉलिवूडचे सगळेच कलाकारमंडळी कपिल शर्माच्या सेटवर हजेरी लावताना दिसतात. त्यामुळेच पुन्हा 'कहानी 2' सिनेमानंतर विद्या बालन आता विद्या बागची नाहीतर बेगम जान बनत कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली.विद्यासह इला अरूण,गौहर खान,पल्लवी शर्मा या सगळ्यांनी मिळून कपिलवर खूप मस्करी करत मजा मस्ती करताना दिसले.इला अरूण यांची उपस्थिती असणार म्हटल्यावर एक गाणेही त्यांनी कपिलच्या सांगण्यावरू सादर केले.गाण्याची आवड असल्यामुळे त्यालाही राहवले नाही त्यानेही इला अरूणसह गाणे गात शोमध्ये आणखी रंगत आणल्याचे पाहायला मिळाले.बेगम जानच्या संपूर्ण लेडी गँगची मजा मस्ती करताना पाहात नवज्योत सिंह सिध्दु हे ही स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनीही स्टेजवर येत या लेडी गँगसह गाण्यावर ठेका धरत पाहायला मिळायले.यावेळी अली असगरने काळ्या रंगाची साडी परिधान करत मंचावर हजेरी लावली.त्यावेळी कपिल शर्मानेही त्याच्या साडीचा पदर खेचत त्याची थट्टा मस्करी केल्याचे पाहायाला मिळाले.मात्र यावेळी अली असगरने आपल्या खास विनोदी शैलीने कपिल शर्माचीही बोलती बंद केलीं.'बेगम जान हा' ‘राजकहिनी’ या बंगाली सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या बंगाली व्हर्जनमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता दिसली होती.हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवती-भवती फिरणारी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथा-पालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे. सर्वात विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसणार आहे.विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, रजत कपूर व गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला बेगम जान हा चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी याने केले असून हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. निमार्ता महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला ‘बेगम जान’च्या माध्यमातून दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी बॉलिवूडमध्ये पर्दापण करीत आहेत. इला अरूण, पल्लवी शारदा, रजीत कपूर, आशिष विद्यार्थी, पूनम सिंग राजपूत, रिधीमा तिवारी, फ्लोरा सैनी, प्रियांका सेटिया, मिश्टी चक्रवर्ती, राजेश शर्मा आदींच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.   

Web Title: Vidya Balan with 'Begum Jan' cinema team, Kapil's set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.