Vandana Pathak's accident on the set of 'Khichdi' series, rest will take some days | 'खिचडी' मालिकेच्या सेटवर वंदना पाठक यांचा झाला अपघात,काही दिवस घेणार विश्रांती

'खिचडी' मालिकेत जयश्री पारेखच्या भूमिकेत वंदना पाठक अगदी बडबड्‌या भूमिकेत दिसून येत आहेत. अशी माहिती मिळाली आहे की नुकताच सेटवर त्यांचा अपघात झाला. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना वंदना घसरून पडल्या आणि त्यांना काही दिवस औषधोपचार देण्यात येत आहेत. सूत्रांनुसार, व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना घसरल्यामुळे वंदना यांना दुखापत झाली होती. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्यांना नीट आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यावर वंदना म्हणाल्या, “मी खूपच घाबरले कारण मला उठताच येत नव्हते.सेटवरील लोकांनी मला मदत केली आणि जवळच्या इस्पितळात नेले. माझा हात खूप दुखतोय आणि पाठीलाही मार लागला आहे. त्यामुळे मला काही दिवस चित्रीकरण करणे शक्य नाही. मी आशा करते की लवकरच बरी होईन आणि चित्रीकरण करायला सुरूवात करेन.”


या शो च्या आधीच्या सीझन्समध्ये जयश्री अगदी भारतीय गुजराती लूकमध्ये प्लेन गुजराती साडी आणि साध्या हेअरस्टाईलमध्ये दिसून आली होती. पण आताजयश्रीचा लूक बदलण्यात आला असून ती अगदी मॉडर्न अवतारात दिसून येईल. याबद्दल जेडी मजेठिया म्हणाले, पारंपारिक असली तरी जयश्रीची व्यक्तिरेखा पारेख परिवार आणि वास्तविक जग यांमधील दुवा आहे.ती बदलत्या काळासोबत बदलली असून आता ह्या शो सोबत परत येताना जयश्री होती तशीच आहे फक्त तिला आम्ही लूक पाश्चिमात्य दिला आहे.

वंदनाने 'हम पाँच','खिचडी' यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर वंदना 'साथ निभाना साथिया'मालिकेतही झळकल्या होत्या.वंदना या मालिकेत नेिगेटीव्ह भूमिका साकारली होती.मात्र  गौरी ही व्यक्तिरेखा दिवसेंदिवस जास्त नकारात्मक  बनत चालली आहे. ही गोष्ट वंदनाला पटत नसल्याने तिने ही मालिका सोडली होती.2000 च्या सुरुवातीला 'खिचडी'  ही मालिका तुफान यशस्वी ठरली होती आणि आता ही मालिका परत  आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Web Title: Vandana Pathak's accident on the set of 'Khichdi' series, rest will take some days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.