Vaibhav demanded and Abir Sufi went to Shirdi and blessed him with Saibaba | वैभव मांगले आणि ​अबीर सूफी यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे घेतले आशीर्वाद

साई बाबा समाधीच्या शतक वर्षी, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने 'मेरे साई' हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या मालिकेत साईबाबांचा जीवन प्रवास आणि शिकवण याबद्दल माहिती दिली जाणार आहे. या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना अबीर सुफीला पाहायला मिळणार आहे. १००० हून अधिक कलाकारांचे ऑडिशन घेतल्यानंतर या मालिकेसाठी अबीरची निवड करण्यात आली आहे. अबीरने या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो त्याच्या विनोदी आणि गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
मेरे साई या मालिकेचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. या मालिकेच्या टीममधील अबीर सुफी, तोरल रासपुत्र आणि वैभव मांगले यांनी नुकतेच शिर्डीला जाऊन त्यांच्या या मालिकेसाठी साईबाबांचे आशीर्वाद घेतले. या शो च्या टीम साठी ही शिर्डीची ट्रीप खूपच छान होती. शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घ्यायला मिळाल्यामुळे अबीर खूपच खूश झाला होता. माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झाली असे अबीर सांगतो. अबीर त्याच्या या शिर्डी ट्रीपविषयी सांगतो, “मी एक वर्षभर अगोदर माझ्या आई सोबत दर्शनासाठी मंदिरात आलो होतो. त्यावेळी मंदिरात खूपच गर्दी असल्यामुळे मला फक्त मुख दर्शनावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तेव्हाच मी बाबांना प्रार्थना केली होती आणि त्यांना विनंती केली होती की, पुढच्या वेळी मी मंदिरात येईन तेव्हा तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने मी प्रसिद्ध सेलिब्रेटी बनलेलो असेन. मला माहीत नव्हतं की, बाबा माझ्यावर इतक्या लवकर आशीर्वादांचा वर्षाव करतील आणि मी साईबाबांच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेत काम करेन. आमच्या मालिकेचे चित्रीकरण सुरू केल्यानंतर आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी सगळे शिर्डीला गेलो होतो, तो माझ्यासाठी हा एक सुखद अनुभव होता. तिथे गेल्यावर मला माझ्या भावनांवर नियंत्रण करणे कठीण झाले होते.
या मालिकेत अबीर सुफी यांच्यासोबतच वैभव मांगले आणि शर्मिला राजाराम हे दोन मराठी चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

Also Read : शर्मिला राजाराम सांगतेय हिंदी मालिकेत काम करतेय असे वाटतच नाहीये
Web Title: Vaibhav demanded and Abir Sufi went to Shirdi and blessed him with Saibaba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.