Usha Nadkarni becomes Gabbar in Bigg Boss and silk Tipnis sings on the song of Sridevi | बिग बॉस मराठीमध्ये उषा नाडकर्णी बनणार गब्बर तर रेशम टिपणीस थिरकरणार श्रीदेवीच्या गाण्यावर

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री हे कार्य देण्यात आले होते. या टास्क मध्ये ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे राहाण्याची संधी मिळणार होती. घरातील सदस्यांनी सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडले. बिग बॉस यांनी हुकमी चौकट हे कॅप्टनसीचे कार्य घरातील सदस्यांवर सोपवले. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागली. टीम मेघा आणि टीम सुशांत यांना युक्तीद्वारे आणि चालाखीने चांगलीच लढत दिली. सुशांत आणि मेघामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनणार? कोण कॅप्टनसीच्या टास्कमध्ये बाजी मारणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनामध्ये होता. या दोन्ही उमेदवारांना त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थकांनी करायचा होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांपासून आपआपल्या उमेदवाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न त्या उमेदवाराचे समर्थक करणार होते. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे असून हाच समर्थकांचा उद्देश होता. ज्यामध्ये रेशम, आस्ताद म्हणजेच टीम सुशांत यांनी कार्याचे नियम तोडून मेघाला चौकटीच्या बाहेर पाडले... त्यामुळे बिग बॉस यांनी सुशांत नव्हे तर मेघावर बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपावली. तर काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे त्यागराज खाडिलकरची एन्ट्री झाली. 
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघा, सई आणि पुष्कर मध्ये वाद विवाद, नाराजगी होताना दिसली. तर मेघाने घरातील सदस्यांवर नाराजगी व्यक्त केली खास करून आऊ, सई आणि पुष्कर यांच्यावर. आज घरामध्ये खूपच उत्साहाचे वातावरण असणार आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य वेगळ्या पोशाखात दिसणार असून ते काही अॅक्टस देखील सादर करणार आहेत. रेशम टिपणीस श्रीदेवी सारखी साडी नेसून मिस्टर इंडिया मधील “काँटे नही कटते” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे तर आऊ शोले मधील गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Also Read : ​बिग बॉस मराठीची स्पर्धक शर्मिष्ठा राऊतने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केला हा मोठा उलगडा

 
Web Title: Usha Nadkarni becomes Gabbar in Bigg Boss and silk Tipnis sings on the song of Sridevi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.