Unseen footage shown on this show | या शो चे दाखवले जाणार अनसीन फुटेज

आजकालच्या स्मार्ट जगात सर्वाना झटपट आणि स्मार्ट काम करण्याची सवय लागलेली आहे . तरुण वर्ग तर स्मार्टफोनशिवाय तर राहूच शकत नाही .पण ह्याच स्मार्टफोनच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या ठिकाणी राहाव लागलं तर ....?  वायकॉम १८ चे वूट वर  "स्टुपिड मॅन स्मार्ट फोन " हा आपला पहिला सर्व्हायवल शो ची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या शो चे दुसरे पर्व राजस्थान मध्ये शूट झालेले असून कॉमेडियन सुमित व्यास हे असणार आहेत , तसेच त्यांच्यासोबत युट्युबर साहिल खट्टर सुद्धा असणार आहे.काही महिन्यांपूर्वी बीबीसी चॅनेलवर ‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा एक सर्व्हायवल शो गाजला होता. केवळ एका स्मार्टफोनच्या आधारावर कुठल्या तरी जंगलात दिवस काढणे असा हा शो होता. "स्टुपिड मॅन स्मार्ट फोन " शोच्या इंडियन व्हर्जनचे चित्रीकरण ‘बीबीसी वर्ल्डवाइड प्रॉडक्शन’ आणि ‘वूट’ एकत्रितपणे याच शूट पूर्ण होऊन आता ‘वूट’ च्या अँप वर लॉन्च झालेल आहे . सुमित आणि साहिल ह्या दोघांनी राजस्थानच्या वाळवंटातही काय काय धमाल केली आणि शूट दरम्यान ह्या दोघांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं हे अनसीन फुटेज ‘वूट’ आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत . 


सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ तरूणाईत चांगलीच दिसते. वेबसिरिज असो, एखादा टीव्ही शो, किंवा रिऍलिटी शो असो, स्मार्ट फोनच्या माध्यमातून कुठेही पाहता येतात. स्मार्ट फोन हा किती गरजेचा आहे किंवा कुठेही जगण्याचं साधन म्हणून स्मार्ट फोन वापरला जाऊ शकतो का असा प्रश्न बहुतेकदा पडतो. काही महिन्यांपूर्वी बीबीसी चॅनेलवर ‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा एक सर्व्हायवल शो गाजला होता. केवळ एका स्मार्टफोनच्या आधारावर कुठल्या तरी जंगलात दिवस काढणे असा हा शो होता. शोच्या इंडियन व्हर्जनचे चित्रीकरण ‘बीबीसी वर्ल्डवाइड प्रॉडक्शन’ आणि ‘वूट’ एकत्रितपणे 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोचं वैशिष्ट्य हे आहे की हा शो केवळ ‘वूट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. या शोचा प्रमुख चेहरा अर्थात सर्व्हायवर असेल सुमित व्यास.सुमितची ‘परमनेन्ट रूममेट्स’ ही वेबसिरिज बरीच गाजली होती. इंग्लिश विंग्लिश, औरंगजेब या सिनेमात तसेच छोट्या पडद्यावरही सुमितने काम केलं आहे. बीबीसीवरील शोमध्ये रूसेल केन हा अभिनेता, कॉमेडियन या शोचे ऍंकरिंग करत होता. सुमित व्यास हा एक सर्व्हायवर असेल ज्याच्यासोबत केवळ एक स्मार्टफोन, फोनची बॅटरी व फक्त शोसाठी गरजेच्या अशा काही वस्तू असतील. सुरूवातीला सुमितसोबत एक सेलिब्रिटी पार्टनर असणार आहे,जो त्याला तमिळनाडूतील एका जंगलात सोडेल. अशाप्रकारे आणखी दोन ठिकाणी हा शोचे शूटिंग होणार आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी स्मार्टफोन किती काम करेल व सोशल मीडिया सुमितला किती मदत करेल याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही असेल.
Web Title: Unseen footage shown on this show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.