Unique Songs of Popular Songs | लोकप्रिय गाण्यांचा अनोखा नजराणा

महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रातील एक सांगीतिक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, या घराण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या घराण्याने कव्वाली, पारंपरिक गाणी, भारुड, गोंधळ, प्रेम गीते इत्यादी गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली असे “शिंदे घराणे”. प्रल्हाद शिंदेपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आल्हाद शिंदे म्हणजेच त्यांच्या पणतू पर्यंत सुरु आहे. कलर्स मराठी पहिल्यांदाच या घराण्याला एकत्र घेऊन येणार आहेत “शिंदेशाही बाणा” या कार्यक्रमामधून ज्यामध्ये ऐका सत्यनारायणाची कथा पासून देवा तुझ्या गाभाऱ्याला अश्या अनेक गाजलेल्या गाण्यांचा समावेश असणार आहे. 

शेकडो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले धृवतारे. आनंद शिंदे ते आल्हाद शिंदे सगळे एकाच मंचावर येऊन गाणे सादर करणार त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मेजवानी ठरणार हे नक्की. या कार्यक्रमाची सुरुवात आनंद शिंदेनी काही सुप्रसिध्द गाण्यांनी केली, ज्यामध्ये पार्वतीच्या बाळा, मोरया मोरया यांचा समावेश होता, त्यानंतर त्यांचेच सुपुत्र आदर्श शिंदे ज्याने लोकसंगीताच्या सोबतच भक्तिगीते, चित्रपट गीते म्हणून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली, त्याचेच प्रसिध्द देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणे म्हटले आणि सभागृहामध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले. इतकेच नव्हे तर या गाण्यानंतर आदर्शने “दुधात नाही पाणी” ही अप्रतिम गवळण सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आनंद शिंदे आणि त्यांचे भाऊ मिलिंद शिंदे यांनी प्रल्हाद शिंदे यांचे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे गाण म्हटले आणि प्रल्हाद शिंदे यांना  मानवंदना अर्पण केली. उत्कर्ष शिंदे याने देखील त्याचे घुंगराच्या तालामंदी आणि चिमणी ही गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये आनंद शिंदे यांच्या नातवाने म्हणजेच आल्हादने गोड स्वरात आपल्या गाण्याची झलक उपस्थितांना दाखवली आणि त्यांची मने जिंकली. 
Web Title: Unique Songs of Popular Songs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.