‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:45 PM2019-01-28T17:45:02+5:302019-01-28T17:47:09+5:30

‘विठुमाऊली’ या मालिकेतून विठ्ठल आणि भक्तीचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे.

The unique saga of the devotional path of 'Vithu mauli' series will emerge from the series | ‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा

‘विठुमाऊली’ मालिकेतून उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून विठ्ठल आणि भक्तीचा अनोखा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. विठुमाऊलीच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या भक्तांमध्ये कलीने दुफळी माजवायला सुरुवात केली आहे. भक्त आणि भगवंत यांच्या अंताची सुरुवात होणार की काय अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पुंडलिकाने विठ्ठलाचे मंदिर बांधण्याचे ठरवले आहे. प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ साधत पुंडलिक माऊलींचे मंदिर पंढरीत उभे करणार आहे. पण पुंडलिकाचा हा प्रवास प्रचंड खडतर आहे. मंदिर बांधू नये असा मतप्रवाह एकीकडे असल्यामुळे पुंडलिकाला विरोधाचा सामनाही करावा लागणार आहे. या अडथळ्यांवर मात करण्यात पुंडलिक यशस्वी होणार का? विठ्ठलाचं मंदिर कसे आकाराला येणार? याचा रंजक प्रवास ‘विठुमाऊली’च्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.


विठुमाऊली' मालिकेमधून विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती प्रेक्षकांना मिळत असते. भक्तीचा हा प्रवास उत्तरोत्तर रंजक होणार आहे. 'विठुमाऊली' या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. ‘विठुमाऊली’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

Web Title: The unique saga of the devotional path of 'Vithu mauli' series will emerge from the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.