'Ullu is sitting at every branch'? | 'हर शाख पे ऊल्लू बैठा है' 26 फेब्रुवारीपासून राजकीय नेत्यांची करणार पोलखल?

‘त्यांच्या फायद्याचे वचन द्या आणि आपल्या फायद्याचे करा’ हा आजतागायत कायमच संधीसाधू राजकारण्यांचा मंत्र राहिलेला आहे.पण तरीही जेव्हा एखादा राजकारणी साखरेच्या पाकात घोळलेल्या शब्दांत हसतमुखाने वचने दिली की जनता पुन्हा एकदा काहीतरी चांगले घडेल ह्या आशेने त्याला मत देऊन विजयी करते.स्टार प्लस तुमच्यासाठी घेऊन येत आहे असाच एक नेता श्री चैतू लाल (राजीव निगम) ला त्यांच्या नवीन विनोदी राजकीय विडंबन,‘हर शाख पे ऊल्लू बैठा है’ सह. हा मुख्यमंत्री निरागस जनतेला खोटी आश्वासने देऊन भूलवण्यासाठी मानला जातो.अन्य कुठल्याही नेत्याप्रमाणे चैतू हा कटकारस्थानी आहे,शब्दांचा खेळ करणारा आणि संधीसाधू आहे.त्याच्या ठेंगा पार्टीला केवळ काळ्‌या पैशाची हाव आहे आणि त्यासाठी सिस्टममध्ये काहीही कारस्थाने ते करू शकतात.सामान्य लोकांना ज्या गोष्टीचा फायदा होईल त्याची वचने तो देतो पण त्याला ज्याचा फायदा होईल ते तो करतो. ह्या कॉमेडी शोमध्ये त्याला समर्थन देईल त्याची पत्नी इमली देवी (समता सागर).आयुष्यातील प्रत्येक चांगल्याकठीण परिस्थितीमध्ये ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते. जरी चैतू सत्ताधारी पक्षाचा नेता असला तरी घरी मात्र त्याची पत्नीच त्याच्यासाठी आधारस्तंभ आहे. इमलीला आपला भाऊ आणि सीएमचा उत्साही साला पुतन (इश्तियाक खान) ला देशाचा पंतप्रधान बनलेले पाहायचे आहे. आपल्या राज्यातील युवानेता पुतन आपल्या जिजाजीसारखाच धोरणी आहे. त्याच्या विरोधात पोलिसात १३ मामले दाखल असून त्याने राज्यातील सर्व उत्तम महाविद्यालयांमधून पदव्या विकत घेतल्या आहेत.राजकारण आणि भ्रष्टाचारामध्ये पुतन चैतूपेक्षा अजिबात कमी नाहीये.हा शो सामान्य माणसाच्या समस्यांकडे विडंबनात्मक पद्धतीने पाहतो. यात चैतू लाल सामान्य माणसांच्या समस्या जसे शिक्षण, पायाभूत सुविधा,भ्रष्टाचार इत्यादींसोबत लढताना आणि निवडणूकांमधील धांदली,एमएलएची खरेदी विक्री आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या काहीही कमिट्‌या निर्माण करतानाही पाहायला मिळेल. ह्या घडामोडींबद्दल विनोदी परिस्थितीमध्ये राजकारणाची कुरूप बाजू पाहायला मिळेल. ह्या शोबद्दल चैतू लालची भूमिका करणारे राजीव निगम म्हणाले, “आजच्या ह्या काळात राजकारण हे मसालेदार पॉट बॉयलरपेक्षा कमी नाही. त्यामुळे स्टार प्लसचा हा शो एक छान मूव्ह आहे. ह्या विषयात मत न देणारेसुद्धा रूचि राखतात आणि आपले मत प्रदर्शित करतात.त्यांच्या राजकारण्यांबद्दल,पक्षांबद्दल,त्यांच्या विचारसरणीबद्दल किंवा त्यातील व्यक्तींबद्दल आपली अशी मते असतात.चैतू लालच्या रूपात मला आपल्या भ्रष्ट राजकारण्यांचा चुकीचा कारभार ऑनस्क्रीन साकारायला मिळेल. मला आशा आहे की प्रेक्षकांना मी एका भ्रष्ट राजकारण्याच्या रूपात आवडेन, जो लोकांच्या कल्याणाचे वचन देतो आणि अखेर स्वतःचा तसेच आपल्या मित्र आणि परिवाराचा फायदा होईल अशाच गोष्टी करतो. राज्याचा मुर्ख, स्वार्थी आणि सगळ्‌या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा मुख्य मंत्री म्हणून प्रेक्षकांना माझा राग येईल.” त्यांची सत्तेची आस, विकासाचे वळणावळणाचे मार्ग,भ्रष्टाचार आणि खुर्चीसाठी काहीही करण्याची तयारी २६ फेब्रुवारीपासून या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
Web Title: 'Ullu is sitting at every branch'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.