Uber company's driver has done this actress | ​उबर कंपनीच्या ड्रायव्हरने या अभिनेत्रीला केली शिवीगाळ

प्राइव्हेट कॅबचे ड्रायव्हर अनेकवेळा लोकांना शिव्या देतात, त्यांच्याशी अतिशय वाईट पद्धतीने वागतात असे आपण ऐकलेच आहे. त्यामुळे प्रायव्हेट कॅबने जात असताना ड्रायव्हरसोबत भांडणे होणे यात काही नवीन राहिलेले नाही. नुकताच असाच एक अनुभव एका अभिनेत्रीला आला असून तिने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मल्लिका दुआने तिच्या कॉमेडीने अनेक लोकांना तिचे फॅन्स बनवले आहे. इंटरनेटवरील तिचे कॉमेडीचे व्हिडिओ प्रचंड प्रसिद्ध आहेत. ती सध्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात सध्या ती प्रचंड व्यग्र आहे. नुकतीच ती एका कामासाठी अंधेरीला गेली होती. अंधेरीवरून वांद्रेला जाण्यासाठी तिने उबर टॅक्सी केली होती. या टॅक्सीत बसल्यानंतर तिला खूप गरम होत असल्याने तिने ड्रायव्हरला एसी वाढवायला सांगितला तर त्यावर टॅक्सी चालकाने मल्लिकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. टॅक्सीत काय काय घडले हे तिने सोशल मीडियावर शेअर केले असून उबर ही सगळ्यात वाईट कंपनी असल्याचे तिने म्हटले आहे.

mallika dua


मल्लिकाने फेसबुकच्या पेजवर लिहिले आहे की, उबर त्यांच्या ड्रायव्हरची प्रोफाईल तपासत नाही असेच आता मला वाटायला लागले आहे. आजवर या कंपनीला एवढ्या समस्या सहन कराव्या लागल्या आहेत. पण त्यातूनदेखील ते सुधारले आहेत नाहीत. चेतन या उबरच्या चालकाला ज्यावेळी मी एसी वाढवायला सांगितला, त्यावेळी त्याने मला गाडीतून उतरायला सांगितले. तो माझ्याशी अतिशय वाईट भाषेत बोलला की, एसी नाही वाढवणार, तू इथेच उतर. त्यावर त्या चालकासोबत माझी खूप बाचाबाची झाली. तो खूप उद्धट असल्याचे त्याला मी सांगितले. तसेच मी तुझ्यावर कारवाई करणार असे देखील मी त्याला बोलली त्यावर मला शिव्या देत तू गाडीतून आताच उतर असे तो सतत बोलत होता. त्यानंतर त्याने जोरात गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी थांबव असे मी त्याला अनेक वेळा सांगून देखील त्याने ऐकले नाही. उलट तो मला शिव्याच देत होता. माझ्यासाठी हा अनुभव खूपच भयावह होता. 

Also Read : एली अवरामने वाढवली अक्षय कुमारची डोकेदुखी... अक्षयच्या मदतीला आला मनीष पॉल !
Web Title: Uber company's driver has done this actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.