Two hearts are getting stupid, Varun Turkey and Sonal Vengurlekar's colorful real love story! | दो दिल मिल रहे है चुपके-चुपके,वरूण तुर्की आणि सोनल वेंगुर्लेकरमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी!

एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे. असंच काहीसं टीव्हीचे  ऑनस्क्रीन कपल वरूण तुर्की आणि सोनल वेंगुर्लेकरमध्ये घडत आहे. चोरी चोरी चुपके चुपके 'साम दाम दंड भेद'मालिकेच्या सेटवर रिअल लव्हस्टोरी फुलू लागली आहे. वरूण आणि सोनल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.विशेषतः वरूण आपल्या लेडी लव्ह सोनलला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. सोनलला सरप्राईजेस देणे हा जणू वरूणचा छंदच बनला आहे.सकाळ संध्याकाळ वरूण सोनलसाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी तर वरूणने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच सोनलसाठी खास गिफ्टही मागवलं होतं. हे गिफ्ट पाहून सोनलच्या आनंदाला पारावार उरला नाही.त्यामुळे  सोनलसुद्धा वरूणवर लट्टू झाल्याचे बोललं जात आहे. सूत्रांच्या माहिती नुसार,सोनलने नुकतेच अभिनेरा सुमित भारद्वाजसोबत ३ वर्षांच्या प्रेमसंबंधांनतर अनुरूपतेच्या समस्येवरून नाते तोडले असून ह्या शो च्या सेटवर ती वरूणला भेटली.याबद्दल सोनल म्हणाली, “सुमित आणि मी आयुष्यात पुढे गेलो आहोत.मला ब्रेकअपनंतर लगेच कुठलेही नाते जोडायचे नाहीये.वरूण खूपच छान मुलगा आहे आणि त्याच्यासोबत राहायला मला आवडतं.तो माझा चांगला मित्र असून अजून कुठे मी त्याला अधिकाधिक जाणून घेत आहे.आमचे भविष्य काय असेल ते मला ठाऊक नाही,पण आत्ता तरी त्याच्यासोबत वेळ घालावायला मला आवडते आहे.”

'साम दाम दंड भेद' मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.या मालिकेत रोमँटीक ट्रॅकप्रमाणे राजकीय ड्रामाही पाहायला मिळत आहे.या सगळ्याघडामोडीसह आता विजय आणि बुलबुल या लव्हबर्डची प्रेमकथा बहरताना दिसणार आहे.भानु उदय विजय ही भूमिका साकारत आहे तर ऐश्वर्या खरे यात बुलबुलची भूमिका साकारत आहे.बुलबुल आणि विजय यांचे दोघांचे कठीण परिस्थितीमध्ये लग्न होते.बुलबुलला विजय आवडतो पण विजय तर तिच्या नजरेला नजरही देत नाही.साहजिकच या दोघांचे हळुङळु बहरणारे प्रेम पाहायला रसिकांनाही मजा येत  असल्याचे मालिकेच्या टीमने सांगितले आहे.हे दोघेही एकमेकांच्या अगदी विरूद्ध आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्व अगदी वेगळे आहे.पण तरीही ऑनस्क्रीन ते एक छान जोडीदाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
Web Title: Two hearts are getting stupid, Varun Turkey and Sonal Vengurlekar's colorful real love story!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.