TV's 'Kiner' is doing a multi-year-old boyfriend Debate, for the first time in a secretly confessed love confession! | टीव्हीची 'किन्नर बहु'5 वर्षे मोठ्या बॉयफ्रेंडला करत आहे डेट,पहिल्यांदाच जाहिरपणे दिली प्रेमाची कबुली!

'रब ने बना दी जोडी' म्हणत अनेक जोडपे आपल्या प्रेमात पडतात कुटुंबियाच्या सहमतीने लग्नबंधनात अडकतात. आता आणखीन एका टीव्हीची किन्नर बहु म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रुबीना दिलाइकने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेला अभिनव शुक्लाला ती गेल्या काही वर्षापासून डेट करत असल्याचे तिने सांगितले आहे.रूबीनाही 5 वर्षाने अभिनव पेक्षा लहान आहे. रूबीना सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. नेहमी तिचे ग्लॅमरस लूक असलेले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते. विशेष म्हणजे तिचा बॉयफ्रेंड हा फोटोग्राफरच असल्यामुळे अभिनवच रूबीनाचे ग्लॅमरस फोटो क्लिक करत असतो. नुकताच रूबीनाने अभिनवसह एक फोटो शेअर केला आहे.शेअर केलेल्या फोटोला तिने रोमँटीक असे कॅप्शनही दिले आहे. ''तुझ्या येण्याने माझे आयुष्य अधिकच सुंदर झाले आहे. गेल्या 4 वर्षापासून तू जशी मला साथ दिली तशीच यापुढेही लाभु दे'' असे तिने म्हटले आहे.रूबीनाला तिच्या अफेअरमुळे लग्नाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सध्या लग्नाचा विचार नसल्याचे तिने म्हटले आहे. योग्यवेळ आल्यावर लग्नाचा विचार करणार असल्याचे रूबीनाने म्हटले होते.रुबीना सध्या 'शक्ति: अस्तित्व के अहसास' या मालिकेत किन्नर (ट्रान्सजेंडर) च्या भूमिकेत दिसत आहे.'छोटी बहू' 'सास बिना ससुराल' 'पुनर्विवाह' ,'देवों के देव...महादेव' आणि 'जीनी और जूजू'  या मालिकांमध्येही ती झळकली होती.या मालिकांमध्ये छोट्या पडद्यार अगदी साडी वजनदार दागिने आणि संस्कारी बहू म्हणून भूमिका साकारणारी रूबीना सध्या खूप बोल्ड झाल्याचे पाहायला मिळतेय. 

Also Read:टीव्ही इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण करण्याची रूबीना दिलाइकची अशीही धडपड?

बालीमध्ये रूबीनाने नुकतेच एक हटके फोटोशुट केले आहे. निळ्या- हिरव्या  रंगाचा  लेहंगा परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये रूबीनाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, तिचा हा 'ग्लॅमरस' लुक तिच्या चात्यांसाठी देखील लक्षवेधी ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून  लोकांसमोर आलेल्या रूबीना या ग्लॅमरस फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वीही रूबीनाने ग्लॅमरस फोटोशूट केले होते ते ही फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी सोशलमीडियावर शेअर केले होते. नेहमी साडीत दिसणारी रूबीनाचा ग्लॅमसर अंदाज पाहून तिच्या चाहत्यांकडूनही तिचे खूप कौतुक केले होते. 
Web Title: TV's 'Kiner' is doing a multi-year-old boyfriend Debate, for the first time in a secretly confessed love confession!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.