The TV actor, who is enjoying the whakelan in the Maldives, came in front of the photo | मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय हा टीव्ही अभिनेता,समोर आले फोटो

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला अभिनेता गौरव खन्ना सध्या पत्नी आकांक्षा चमोलासह मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय.सोशल मीडियावर दोघांनी आपल्या हॉलीडेचे फोटो शेअर केले आहेत. गौरव आणि आकांक्षा समुद्र किनारी रोमँटिक पोज देत असल्याचा फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतोय.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत गौरव पत्नीसह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.गौरवचे हे रिअल लाईफ फोटो जितके त्याच्या चाहत्याच्या पसंती उतरत आहेत. तितकेच त्याचे ऑनस्क्रीन कामही रसिकांना भावतंय. गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कामरा 'चंद्रकांता' ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. गौरवने टीव्हीवरील अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 साली भाभी या मालिकेपासून केली होती. त्यानंतर त्याने 'कुमकुम','जमेगी जोडी डॉट कॉम','मेरी डोली तेरे अंगना','जीवनसाथी','ये प्यार ना होगा कम','दिल से दिया वचन','ससुराल सिमर का' अशा विविध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.सध्या 'तो प्रेम या पहेलीः चंद्रकांता' या मालिकेत भूमिका साकारत आहे.मात्र आता गौरवच्या अभिनयासोबतच त्याच्या रोमँटिक विकेंडची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Also Read:'चंद्राकाता' बनलेल्या क्रितिका कामराला स्वत:ची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर पाहणे आवडत नाही?

अभिनेत्री क्रितिका कामरा 'प्रेम या पहेली चंद्रकांता'मध्ये राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. एरव्ही मालिका पाहण्याचे आग्रहाने रसिकांना सांगणारी क्रितिका कामराच टीव्ही पाहात नाही.इतकेच काय तर ती भूमिका साकारत असलेली मालिका चंद्रकांता टीव्हीवर नाही तर ऑनलाईन पाहात असते.सध्या मालिका या टीव्हीवर कमी आणि ऑनलाईनच जास्त लोकप्रिय होत आहे. त्यामुळे वेबसिरीज हे मनोरंजनाचे उत्तम माध्यम असल्याचे तिला वाटते. सूत्रांनी सांगितले की तिला आपला नवीन टेलिव्हिजन शो प्रेम या पहेली चंद्रकांता ऑनलाईन आपल्या मेकअप रूममध्ये पाहायला आवडतो.
Web Title: The TV actor, who is enjoying the whakelan in the Maldives, came in front of the photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.