TV actor Vijay Soni shares wife shower of Pooja Baby Shower Photo | टीव्ही अभिनेता विजय सोनीने शेअर केले पत्नी पूजाचे बेबी शॉवर फोटो

'ससुराल गेंदा फूल' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता जय सोनी लवकरच पिता बनणार आहे.त्यामुळे तो सध्या खूप खुश आहे.नुकतेच जयची पत्नी पूजाचे डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम कण्यात आला.विशेष म्हणजे यावेळी काढण्यात आलेल्या फोटोही याच थीमवर होते.त्यामुळे जयसुध्दा प्रेग्नेंट लूकमध्ये दिसला.त्याने या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. जय आणि पूजाचे हे पहिले बाळ असणार आहे. 2014 मध्ये पूजा आणि जयने पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते.या कार्यक्रमात जयचे कुटुंबियांसह इंडस्ट्रीतले सगळे कलाकारमंडळींनी हजेरी लावली होती.जय आणि पूजाने या सोहळ्यात सा-यांमोर येताच एकच जल्लोष झाला.कारण हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये पूजा या कार्यक्रमात पोहचली होती. या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.या कार्यक्रमात विविध खेळ खेळले गेले. याेवळी पूजा सूपर एक्साईटेड होती.सा-यांसह फोटो क्लिक करत फोटोची मजा लुटताना दिसली.जयने 2003 मध्ये आपल्या अॅक्टिंग करियरला सुरुवात केली होती. 'दिल मांग मोर' 'बुड्ढा मर गया', 'मेरा पहला पहला प्यार' या सिनेमात त्याने छोट्या छोट्या भूमिका साकरल्या होत्या.मात्र 'बा बहू और बेबी' मालिकेत तो झळकला आणि याच मालिकेतून तो प्रकाशझोतात आला. 'धरती की वीर योद्धा पृथ्वीराज चौहान', 'संस्कारः धरोहर अपनो की', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'भाग बकूल भाग' या मालिकेत झळकला होता.Web Title: TV actor Vijay Soni shares wife shower of Pooja Baby Shower Photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.