Tula Pahate Re मालिकेतील जयदीप सरंजामे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:34 PM2018-10-17T12:34:41+5:302018-10-17T12:36:39+5:30

'तुला पाहते रे' या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. 

Tula Pahate Re Serial Jaydeep Saranjame Got Acting Lessons From Home, He Is Son Of this Marathi Star | Tula Pahate Re मालिकेतील जयदीप सरंजामे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा लेक

Tula Pahate Re मालिकेतील जयदीप सरंजामे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा लेक

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे'  ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावते आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. 


महाविद्यालयीन जीवनापासूनच आशुतोषला अभिनयाची आवड होती. त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने सहभाग घेतला होता. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळालं. भाऊचा धक्का, युनो यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो भाग बनला. 'ओ वुमनिया', 'डोन्ट वरी बी हॅपी' आणि भरत जाधवसोबत मोरूची मावशी या नाटकातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. 

आशुतोषच्या रक्तातच अभिनय आहे. त्याचे वडिल हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. विजय गोखले यांचा आशुतोष हा लेक. विजय गोखले यांनी विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यांची भूमिका असलेली श्रीमान श्रीमती ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या. दम असेल तर, भरत आला परत या सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी लेक आशुतोष यालाही अभिनयाची संधी दिली होती.


या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. नुकतंच या मालिकेने टि.आर.पी.चा उच्चांक गाठून टॉप शोजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले. मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून हा आनंद साजरा केला.


 

Web Title: Tula Pahate Re Serial Jaydeep Saranjame Got Acting Lessons From Home, He Is Son Of this Marathi Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.